मुंबई - सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनंतर शिवसेना व बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये शाब्दिक चकमक मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडत आहेत. दोन दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना विधान भवनाचा रस्ता वरळीहून जातो, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे. त्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. युवराजांनी धमक्या देणे बंद करावं, असे राणेंनी ट्विट करत म्हटलं ( narayan rane criticized aaditya thackeray ) आहे.
नारायण राणेंनी म्हणाले की, "शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा. युवराजांनी धमक्या देणं बंद करावं. अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत. गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील, अशा वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल? अशा धमक्या देणं हा गुन्हा होत नाही का?," असा सवाल देखील राणेंनी उपस्थित केला आहे.