महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nana Patole on Rashmi Shukla : 'फोन टॅपिंग प्रकरणांत रश्मी शुक्ला यांच्यावर पाचशे कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार'

वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला या पुण्याच्या कमिशनर असताना त्यांनी आपला फोन टॅप केला. त्या फोन टॅपिंगच्या माध्यमातून त्यांनी आपली वैयक्तिक बदनामी केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole on Rashmi Shukla ) यांनी केला आहे.

Nana Patole
Nana Patole

By

Published : Mar 6, 2022, 4:56 PM IST

मुंबई - वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला या पुण्याच्या कमिशनर असताना त्यांनी आपला फोन टॅप केला. त्या फोन टॅपिंग च्या माध्यमातून त्यांनी आपली वैयक्तिक बदनामी केली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole on Rashmi Shukla ) यांनी केला आहे. रश्मी शुक्ला यांनी केलेल्या बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि वैयक्तिक बदनामी केली असुन या विरोधात पाचशे कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दादर येथील काँग्रेसचे प्रदेश कार्यालय असलेले टिळक भवन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच फोन टॅपिंग प्रकरणांमध्ये तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग असल्यास त्यांच्यावर ही कारवाई केली जाईल असा इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला.

काँग्रेस " भगतसिंह कोश्यारी गो बॅक" आंदोलन करेल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे संविधानिक पदावर बसलेले आहेत.तरीही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपमान करणारी वक्तव्य केली जात आहेत. त्यांच्या वक्तव्याचे समर्थन भाजप करताना दिसत आहे. ज्याप्रमाणे आज पुण्यामध्ये "नरेंद्र मोदी गो बॅक" अस आंदोलन काँग्रेसने केलं. "भगतसिंह कोश्यारी गो बॅक" असा आंदोलनही काँग्रेसकडून केले जाऊ शकते असा इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला.


पंतप्रधानांची विदेश नीती फेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश नीतित अपयशी आहेत. युक्रेन आणि रशियाच युद्ध होणार आहे. हे संपूर्ण जगाला माहित होतं. परिस्थिती पाहता सर्व देशांनी आपले नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्या देशांमधून बाहेर काढलं. मात्र मोदी सरकार पाच राज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त होतं. शेवटी युक्रेन मधून आपल्या विद्यार्थ्यांना परत घेऊन जा असं पत्रक निघाल्यानंतर केंद्र सरकारला जाग आली. त्यानंतर चारशे विद्यार्थी मायदेशी म्हणून केंद्र सरकार स्वतः आपली पाठ थोपटत आहे. हे चुकीचं असून केंद्र सरकारने आपली चूक मान्य केली पाहिजे असा टोला नाना पटोले यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

हेही वाचा -PM inaugurates Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन, हिरवा झेंडा दाखवत मोदींचा मेट्रोतून प्रवास

धारावी पुनर्विकास योजनेत आठशे कोटीचा घोटाळा
धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला परस्पर 800 कोटी रुपये देऊ केले होते. या बदल्यात रेल्वेकडून मिळणारी 45 एकर जमीन मिळालेली नाही. तसेच या पूर्ण प्रक्रियेत ज्या विकासकांना टेंडर देण्यात येणार होते. त्या विकासकांना टेंडर न मिळाल्यामुळेच ही सर्व प्रक्रिया तात्कालीन फडणवीस सरकारने थांबवली. आता रेल्वेकडून 45 एकर जमीनही देण्यात येत नसून आठशे कोटी रुपये परत केले जात नाहीये. त्यामुळे हे 800 कोटी रुपयाचा घोटाळा झाला असल्याचं पत्र आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले आहे. तसेच या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी आपण करणार असल्याचं नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हा मुद्दा आपण मांडणार असल्याचं नाना पटोले यावेळेस म्हणाले.


2024 नंतर एसटीच्या विलीनीकरणाचा प्रयत्न करू
एसटी महामंडळाचा शासनामध्ये विलीनीकरण होऊ शकत नाही. याबाबतचा त्रिसदस्यीय अहवाल सादर झाला आहे. मात्र 2024 च्या नंतर आर्थिक परिस्थिती लक्षात घेता एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या प्रयत्न काँग्रेसकडून पुन्हा केला जाईल असा आश्वासन नाना पटोले यांच्याकडून देण्यात आल आहे. तसेच सध्या एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम भारतीय जनता पक्षाकडून केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मंडल आयोग आल्यानंतर "कमंडल" कोणी आणले
केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यास ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षणाचा प्रश्न लगेच संपुष्टात येऊ शकतो. केंद्र सरकार कडे असलेला डेटा सर्वोच्च न्यायालयात दिल्यास आता उद्भवलेला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. मात्र केंद्र सरकारला ओबीसी च्या राजकीय आरक्षणाचा प्रश्‍न सोडवायचा नाही. केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे केवळ महाराष्ट्रातच नाही तर, देशातल्या इतर राज्यातही ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उद्भवला आहे. तसेच केवळ ओबीसी नाही तर येणाऱ्या काळामध्ये एससी आणि एसटी आरक्षणाचा प्रश्नदेखील उद्भवू शकतो. मूळ प्रश्नापासून लोकांना दूर नेण्यासाठीच भाजप सरकार आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. तसेच मंडल आयोग अस्तित्वात आल्यानंतर त्याचा विरोध करण्यासाठी "कमंडल" भारतीय जनता पक्षाने आणलं अशी टीका भाजपवर नाना पटोले यांनी केली.
हेही वाचा -Ajit Pawar Demand Pm Modi : अजित पवारांनी पंतप्रधान मोदींकडे केल्या 'या' मागण्या

ABOUT THE AUTHOR

...view details