मुंबई - ' व्हाय आय किल्ड गांधी' ( Nana Patole on Why I killed Gandhi ) हा चित्रपट महाराष्ट्र राज्यात चित्रपटगृहात व ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole demand band on Godse movie ) यांनी केली. त्याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या चित्रपटाला कडाडून विरोध करणार असल्याचे त्यांनी ( Nana Patole on press meet ) पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी 'व्हाय आय किल्ड गांधी'या सिनेमाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी पत्रात म्हटले, की फॅसिस्ट विचारांचे नथुराम गोडसे ( Fascist Nathuram Godse ) यांनी ३० जानेवारी, १९४८ रोजी महात्मा गांधीजींची हत्या केली. याच दिवसाचे औचित्य साधून कडव्या विचारांचे चित्रपट निर्माता गांधीजींच्या हत्येचे समर्थन करणारा "व्हाय आय किल्ड गांधी" हा चित्रपट प्रदर्शित करू पहात आहेत. महात्मा गांधीजींच्या विचाराने संपूर्ण जग प्रभावित आहे. आपल्या भारत देशाची ओळख गांधीजींच्या नावाने होते.
हेही वाचा-Jitendra Awhad On Amol Kolhe : अमोल कोल्हेंच्या चित्रपटाला विरोध करणार, आव्हाड आक्रमक
सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या शस्त्रांचा वापर करून जग जिंकता येते हे महात्मा गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातून दाखवून दिले. त्यामुळेच संपूर्ण जगभर ते परम पूज्यनीय आहेत. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचा ३० जानेवारी हा दिवस राष्ट्रीय एकता, जातीय सलोखा, अहिंसा आणि शांतता दिवस म्हणून संपूर्ण जगभरात पाळला जातो. महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीचा दिवस अहिंसा आणि शांतता म्हणून पाळला जातो. दुसरीकडे अशांतता, व्देष आणि हिंसक वृत्तीचे प्रदर्शन करणारा 'व्हाय आय किल्ड गांधी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे फॅसिस्ट वृत्तीला बळ मिळेल. म्हणून या चित्रपटावर बंदी आणा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
महात्मा गांधींच्या विचाराची गरज ही काळाची गरज