महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nana Patole criticizes Assam CM : आसामच्या मुख्यमंत्र्यांचे मानसिक संतुलन बिघडले - नाना पटोले - आसाम मुख्यमंत्री राहुल गांधी टीका

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा (Assam CM Himanta Biswa Sarma) यांनी एका प्रचारसभेत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन वक्तव्य केले होते. हे वक्तव्य भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्यावरील संस्कार दर्शवतात, अशी टीका नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.

Nana Patole
महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

By

Published : Feb 12, 2022, 3:11 PM IST

मुंबई -आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा (Assam CM Himanta Biswa Sarma) यांनी एका प्रचारसभेत काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन वक्तव्य केले होते. हे वक्तव्य भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्यावरील संस्कार दर्शवतात, अशी टीका महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. तसेच बिस्वा शर्मा यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, चांगल्या रुग्णालयात त्यांनी उपचार घ्यावे, असे पटोले म्हणाले.

बिस्वा शर्मा यांनी चांगल्या डॉक्टरकडे उपचार घ्यावेत - नाना पटोले

हेमंत बिस्वा शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करत पटोले म्हणाले की, बिस्वा शर्मा यांचे वक्तव्य अत्यंत अश्लाघ्य व सर्व मर्यादा पार करणारे आहे. राहुल गांधी यांच्याबद्दल त्यांनी काढलेले वक्तव्य हे त्यांची पातळी दाखवून देणारे आहे. भाजपातील वरिष्ठ नेत्यांपासून अनेक नेत्यांना विरोधकांवर अशी वैयक्तिक टीका करुन त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा रोग जडला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दलही हीन दर्जाचा शब्दप्रयोग भाजपा नेत्यांनी वारंवार केला आहे. त्यांची हीच संस्कृती आहे, मात्र काँग्रेसची ही संस्कृती नाही. बिस्वा शर्मा यांना या रोगापासून आराम पडो अशी आमची सदिच्छा आहे. बिस्वा शर्मा यांनी चांगल्या डॉक्टरकडे उपचार घ्यावेत त्यांचा सर्व खर्च काँग्रेस पक्ष करेल, असा टोमणा पटोले यांनी मारला.

भाजपाचे नेते हीन पातळीवरून विरोधकांना बदनाम करतात - पटोले

लोकशाहीमध्ये सरकारला जाब विचारण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे. त्यामुळे एक जबाबदार विरोधी पक्ष या नात्याने राहुल गांधी यांनी सरकारला जाब विचारला. भाजपाने त्यावर आकांडतांडव करण्याची काही गरज नाही. परंतु भाजपा हा लोकशाही व संविधानाला मानत नाही. भाजपाचे नेते हीन पातळीवरून विरोधकांना बदनाम करण्याचे काम करत असतात. बिस्वा शर्मा हे मुख्यमंत्री आहेत, बोलताना काही ताळतंत्र बाळगण्याची आवश्यकता असते. मात्र, त्यांच्यावरचे संस्कारच तसे आहेत, देव त्यांना सद्बुद्धी देवो हीच आमची सदिच्छा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details