मुंबई -दहिसर पूर्व परिससरात एक धक्कादायक घटना अघडकीस आली आहे. येथे एका 28 वर्षीय महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करुन घरातील किचनमध्येच त्याला पूरले. हत्येनंतर महिलेने माझा नवरा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दहिसर पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, पोलिसांनी महिलेला चौकशीसाठी बोलावले असता प्रत्येकवेळी महिलेने वेगवेगळ्या प्रकारची उत्तरे दिली. यामुळे पोलिसांना महिलेवर संशय आल्याने आरोपी महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
हेही वाचा-ठाण्यात हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, २ प्रसिद्ध अभिनेत्रींसह ५ अटकेत, १ लाख ८० हजारात झाला होता सौदा
हेही वाचाः-नागीन फेम अभिनेता पर्ल पुरीला अटक, १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याबाबत कारवाई
पतीचा खून करून घरातच पुरले!
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केली, अशी कबुली आरोपी महिलेने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, आरोपी महिलेचे त्याच्या प्रियकरासोबत गेल्या तीन महिन्यांपासून संबंध होते. त्या प्रेमसंबंधामध्ये पती अडचण निर्माण होत असल्याने पत्नी आणि त्याच्या प्रियकराने त्याचा काटा काढण्याचा प्लॅन तयार केला. त्यानुसार पतीची हत्या करुन घरातील किचनमध्येच त्याचा मृतदेह पुरला.
हेही वाचा -बजाजनगरमध्ये भर वस्तीत आढळला अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह