महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Accused arrested: गिरगाव परिसरात 55 वर्षीय वृद्ध व्यक्तीची हत्या - गिरगाव न्यायाल

गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) परिसरामध्ये वृद्ध 55 वर्षीय व्यक्तीची वीट आणि दगडाने मारून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील डी बी मार्ग पोलिसांनी (DB Road Police) परिसरातील सीसीटीव्ही च्या माध्यमातून आरोपीचा शोध घेत आरोपी सूरज यादवला (Suraj Yadav) अटक केली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dead Body
मृतदेह

By

Published : Jul 5, 2022, 4:29 PM IST

मुंबई- गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) परिसरामध्ये55 वर्षीय वृद्ध व्यक्तीची वीट आणि दगडाने मारून हत्या केल्याप्रकरणी, बी मार्ग पोलिसांनी 23 वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीचा शोध घेण्याकरिता पोलिसांकडून दोन पथक तयार करण्यात आले होते या पथकाने सीसीटीव्ही च्या माध्यमातून आरोपीचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गिरगाव चौपाटीवर एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह (Dead Body) दिसून आला त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आणि 2 पथके तयार केली. त्यावेऴी आरोपी सूरज यादवची पोलिस कोठडीत चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला तसेच त्याने गोव्यातही असाच खून केल्याचे सांगितले.पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर गिरगाव न्यायालयामध्ये (Girgaon Court) हजर करण्यात आले होते त्यावेळी आरोपीला न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडीत पाठवले आहे .

ABOUT THE AUTHOR

...view details