महाराष्ट्र

maharashtra

Mumbra Police Notice to Nupur Sharma : नुपूर शर्माच्या अडचणीत वाढ, चौकशीसाठी 22 जूनपर्यंत हजर होण्याची नोटीस

By

Published : Jun 7, 2022, 4:41 PM IST

मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नुपूर शर्मा अडचणीत आला आहेत. ऑल इंडिया इमाम कॉन्सिलकडून नुपूर शर्मा विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २२ जूनपर्यंत नुपूर शर्माला चौकशीसाठी हजर राहण्याचे मुंब्रा पोलिसांनी आदेश दिले ( Mumbra Police Notice to Nupur Sharma ) आहेत.

Mumbra Police Notice to Nupur Sharma
नुपूर शर्मा

ठाणे -मुंब्रा पोलिसांकडून नुपूर शर्मा यांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आले ( Mumbra Police Notice to Nupur Sharma ) आहे. मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नुपूर शर्मा अडचणीत आला आहेत. ऑल इंडिया इमाम कॉन्सिलकडून नुपूर शर्मा विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २२ जूनपर्यंत नुपूर शर्माला चौकशीसाठी हजर राहण्याचे मुंब्रा पोलिसांनी आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण -मुंब्रा पोलिसांनी भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑल इंडिया इमाम कौन्सिलतर्फे ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. नुपूर शर्मा यांनी एका टीव्हीच्या चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली होती. या आधी देखील मुंबईतील रजा अकादमीने मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता ठाण्यातील मुंब्रा पोलिसांनी मोहम्मद गुफरान अकमल खान यांच्या तक्रारीवरून नुपूर शर्मा विरुद्ध 153A, 153B, 295A, 298, 505 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हा दाखल प्रक्रियेच्या दरम्यान ऑल इंडिया इमाम काऊन्सिलचे उलमा उपस्थित होते. मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी भाजप नेत्या नुपूर शर्मा यांना अटक करून ठाणे न्यायालयात हजर करण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया इमाम काऊन्सिलचे अध्यक्ष मुफ्ती अब्दुल बासित यांनी केली आहे.

22 तारखेला चौकशीला राहावे उपस्थित -नुपूर शर्मा यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये त्यांना 22 जून रोजी चौकशीला उपस्थित राहण्याचे स्पष्ट केलेले आहे.

अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार - अखिल भारतीय पुरोगामी मुस्लिम कल्याण समितीने भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात कलम १५३ए, १५३बी, २९५(अ) अंतर्गत वादग्रस्त धार्मिक वक्तव्याबाबत एफआयआर नोंदवण्यासाठी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दिलीप वळसे पाटलांची माहिती - नुपूर शर्मा यांच्यावर तिच्या वादग्रस्त धार्मिक वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्याचा तपास पोलीस विभागाने सुरू केला आहे. तिच्यावर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले ( dilip walse patil on Nupur Sharma FIR ) आहे.

हेही वाचा - FIR against Nupur Sharma : वादग्रस्त विधान प्रकरणी नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा, पुढील तपास सुरू - वळसे पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details