मुंबई -जगातील 89 किलोमीटर अंतराची वार्षिक मॅराथॉन दक्षिण आफ्रिकेच्या नाताल ते दरबन आणि पीटर मेरीटसबर्ग या शहरात आयोजित केली जाते. दरवर्षी या स्पर्धेत अनेकजण भाग घेतात. आता या स्पर्धेत मुंबईतील 35 धावपटू भाग घेणार आहेत. जगातील सर्वात लांब अंतराची तसेच सर्वात प्राचीन मॅरेथॉन म्हणून या स्पर्धेची ख्याती आहे.
जगातील सर्वात लांब अंतराच्या मॅरेथॉनमध्ये मुंबईतील 35 धावपटू धावणार मुंबईच्या स्ट्रायडर्स या फिटनेस क्लबच्या 35 धावपटूंनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये धावल्यानंतर आता ते जगातील सर्वात मोठ्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये धावणात आहेत. यासाठी त्यांनी गेल्या सहा महिन्यांत मोठे परिश्रम घेतले आहे. हे धावपटू आपल्या कामाच्या वेळात वेळ काढून आणि आपल्या वयाचे भान न ठेवता धावण्याची कला जोपासतात. येत्या 9 जूनला होणाऱ्या बीकॉम रे स्पर्धेसाठी हे सर्वजण सहा जूनला येथे स्थायिक होणार आहेत.
या धावपटूंचा प्रत्येकाचा पेशा वेगवेगळा आहे. कोणी डॉक्टर, इंजिनियर आहे, तर कोणी शिक्षक आहे . परंतु ही सर्व लोक आपल्या छंदाला म्हणजेच धावण्याला मोठे प्राधान्य देतात. त्यासाठी ते स्ट्रायडर्स या फिटनेस क्लब मध्ये येऊन आपला छंद जोपासतात आणि ते लोकांनाही धावण्यासाठी संदेश देतात. या स्पर्धेत सहभाग दर्शवून ते स्वतःला भाग्यवान समजतात कारण आपल्या पैशातून ते देशासाठी काहीतरी करतच आहेत. परंतु देशाचं नाव मोठ्या स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी संधी मिळाली असल्याचं ते धावपटू सांगतात.
काय आहे ही कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा ?
दुसऱ्या महायुद्धादरम्यान हार झालेल्या दक्षिण आफ्रिकन सैनिकांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. जी दक्षिण आफ्रिकेच्या बुजून नाताळ प्रांतात डबल आणि पीटर मॅरेज वर्ग शहरांमध्ये दरवर्षी चालवले जाते. ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात प्राचीन अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा आहे. याची सुरुवात 1921 साली झाली. 1988 सालापासून 25 हजारांपेक्षा अधिक जगातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग दर्शवला आहे. ही स्पर्धा जिंकणाऱ्या धावपटूला उत्तम धावपटूचा किताब जातो. मागील काही वर्षापासून या स्पर्धेत भारतातील अनेक धावपटू सहभाग दर्शवत आहेत.