मुंबई - लग्नाचे आमिष दाखवत वैमानिकाने बलात्कार केल्याचा आरोप छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीने केला आहे. तिने या संबंधी ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून वैमानिकाविरोधात ३७६ आणि ४१७ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
अशी झाली होती ओळख
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने या संबंधी तक्रार दिली होती. त्यानंतर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अभिनेत्रीची वैमानिकाशी ओळख 'मॅट्रिमोनियल साइट्सवरून झाली होती. त्यानंतर वैमानिकाने अभिनेत्रीचा फोन नंबर मिळवून तिच्याशी बोलणे सुरू केले. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते.
लग्नाचे दाखवले होते आमिष
ओळख वाढल्यानंतर वैमानिकाने अभिनेत्रीकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा अभिनेत्रीने त्याला तिच्या घरी बोलावले. तिथे वैमानिकाने तिच्याशी लग्न करतो, अशी बतावणी करत, तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार पुढे अनेक दिवस सुरू होता. तेव्हा पीडितेने वैमानिकाकडे लग्नाचा तगादा लावला. तेव्हा वैमानिकाने पीडितेचे फोन उचलणे आणि बोलणे बंद केले. तसेच त्याने लग्नाला नकार दिला. यानंतर पीडितेने ओशिवारा पोलीस स्टेशन गाठत वैमानिकाविरोधात तक्रार दिली.
हेही वाचा -मुंबई महानगरपालिका रेल्वेवर मेहरबान; 527 कोटी रुपयांचे पाणी बिल थकीत
हेही वाचा -मुंबईत लसीकरण पुन्हा सुरू, आठवड्यातून चार दिवस लसीकरण