महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Hanuman Chalisa Case राणा दाम्पत्याला दिलासा, सरकारची मागणी न्यायालयाने फेटाळली - हनुमान चालिसा प्रकरण

हनुमान चालिसा प्रकरणात अटकेनंतर देण्यात आलेला जामीन अटींचा उल्लंघनाचा आरोप करत जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र पोलिसांची ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा MP Navneet Rana and MLA Ravi Rana यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी केलेली मागणी मुंबई सत्र न्यायालयाने Mumbai Sessions Court फेटाळली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

Hanuman Chalisa Case
Hanuman Chalisa Case

By

Published : Aug 22, 2022, 4:11 PM IST

मुंबई -खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा MP Navneet Rana and MLA Ravi Rana यांचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी केलेली मागणी मुंबई सत्र न्यायालयाने Mumbai Sessions Court फेटाळली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. हनुमान चालिसा प्रकरणात अटकेनंतर देण्यात आलेला जामीन अटींचा उल्लंघनाचा आरोप करत जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र पोलिसांची ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा : महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याच्या घोषणेने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याच्या आरोपाखाली राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राणा दाम्पत्यांना 23 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. आमदार-खासदारांविरुद्धच्या प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश रोकडे यांनी 4 मे रोजी राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर केला होता.

काय आहे प्रकरण ? : भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यावरून राजकारण चांगलेच तापले होते. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. राणा दाम्पत्याच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला होता.

हेही वाचा -Rana Couple राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार का, खार पोलिसांच्या अर्जावर 22 ऑगस्ट रोजी सत्र न्यायालय देणार निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details