महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Anil Deshmukh Case To CBI : अनिल देशमुख यांचा ताबा सीबीआयकडे; मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय - अनिल देशमुख यांच्या बातम्या

निल देशमुख यांच्यावर कथित वसुली प्रकरणाचा आरोप केल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात यावा याकरिता जयश्री पाटील यांनी सीबीआयला तक्रार केली होती. (Anil Deshmukh Case To CBI) त्यानंतर या प्रकरणात सीबीआयने तपास सुरू केला असता, या प्रकरणात पहिली अटक सीबीआयने केली होती. आता या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले अनिल देशमुख यांचा ताबा सीबीआयला मुंबई सत्र न्यायालयाने गुरुवार रोजी दिला आहे.

अनिल देशमुख
अनिल देशमुख

By

Published : Apr 1, 2022, 7:38 AM IST

मुंबई -राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित वसुली प्रकरणाचा आरोप केल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात यावा याकरिता जयश्री पाटील यांनी सीबीआयला तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणात सीबीआयने तपास सुरू केला असता, या प्रकरणात पहिली अटक सीबीआयने केली होती. (Anil Deshmukh Case Handed) आता या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले अनिल देशमुख यांचा ताबा सीबीआयला मुंबई सत्र न्यायालयाने गुरुवार रोजी दिला आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

न्यायालयाने सीबीआयच्या अर्जाला मंजुरी दिली - ईडी नंतर आता आर्थिक भ्रस्टाचार प्रकरणात चौकशी करीता सीबीआयने अनिल देशमुख, सचिन वाजे, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे या चौघांचा ताबा मिळवण्यासाठी मुंबई सत्र न्यायालय विशेष सीबीआय न्यायाधीस डी. पी. शिंगाडे यांच्याकडे अर्ज केला होता. (Deshmukh Case In Mumbai Sessions Court ) न्यायालयाने सीबीआयच्या अर्जाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या सर्व आरोपींची चौकशी सीबीआय करणार आहे. अनिल देशमुख आणि इतर आरोपींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या तळोजा कारागृहात आहेत - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख सध्या ईडीच्या अटकेनंतर आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हत्या प्रकरणातील एटीएसने अटक केल्यानंतर सध्या तळोजा कारागृहात आहेत. तर अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे ते आर्थर रोड जेलमध्ये आहेत. या सर्व चारही आरोपींचा ताबा सीबीआयने मागितल्यानंतर आता या प्रकरणात सीबीआर या चारही आरोपींची चौकशी करणार आहे.


काय आहे प्रकरण?मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होते असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.

सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत - यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच, देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

हेही वाचा -एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दणका, 11 हजार कंत्राटी कर्मचारी भरण्याची परिवहनमंत्र्यांची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details