महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईमधील शाळांना पुढील आदेशापर्यंत टाळेच - Mumbai School

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता नव्या आदेशानुसार १६ जानेवारीला आढावा घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंदच राहाणार आहेत.

मुंबईतील शाळा
Mumbai School

By

Published : Jan 15, 2021, 9:00 PM IST

Updated : Jan 15, 2021, 9:08 PM IST

मुंबई- राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा येत्या २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता सर्व शाळा पुढील आदेश मिळेपर्यंत बंदच राहतील असे परिपत्रक पालिकेच्या शिक्षण विभागाने काढले आहे.

मार्च २०२०पासून शाळा बंदच -
मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला. मार्च पासून सर्व व्यवहार बंद झाले. शाळाही बंद झाल्या. इतकेच नव्हे तर दहावीचा एक पेपरही रद्द करण्यात आला. पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्यात आला. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यावर ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आल्या. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होतील. ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केला होता.

Mumbai School
शाळा बेमुदत बंद -मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात होती. जगभरात आणि भारतात दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. दिवाळी निमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती. थंडीही सुरू झाल्याने रुग्ण वाढतील म्हणून ३१ डिसेंबर पर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या. डिसेंबर महिन्यात आढावा घेऊन १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता १६ जानेवारी पासून पुन्हा आढावा घेऊन पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. तसे परिपत्रक पालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी काढले आहे.
Last Updated : Jan 15, 2021, 9:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details