महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचे 1299 नवे रुग्ण, 52 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत आज 1 हजार 299 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 96 हजार 379 वर पोहचला आहे.

corona
कोरोना

By

Published : May 22, 2021, 10:08 PM IST

मुंबई -मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते, त्यात गेल्या काही दिवसात घट झाली होती. आज 1299 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1827 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा-जालन्यात एकाच महिलेला दोन वेगवेगळ्या लसींचे डोस; आरोग्य विभाग करणार चौकशी

रुग्ण दुपटीचा कालावधी 326 दिवस -

मुंबईत आज 1 हजार 299 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 96 हजार 379 वर पोहचला आहे. आज 52 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 574 वर पोहचला आहे. 1 हजार 827 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 51 हजार 216 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 28 हजार 508 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 326 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 62 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 246 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 29 हजार 264 तर आतापर्यंत एकूण 60 लाख 48 हजार 686 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच -

1 मे ला 3908, 2 मे ला 3672, 3 मे ला 2662, 4 मे ला 2554, 5 मे ला 3879, 6 मे ला 3056, 7 मे ला 3039, 8 मे ला 2678, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 11 मे ला 1717, 12 मे ला 2116, 13 मे ला 1946, 14 मे ला 1657, 15 मे ला 1447, 16 मे ला 1544, 17 मे ला 1240, 18 मे ला 953, 19 मे ला 1350, 20 मे ला 1425, 21 मे ला 1416, 22 मे ला 1299 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा -अतिक्रमण काढण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः हातात घेतला हातोडा..पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details