मुंबई -मुंबईत गेले काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते, त्यात गेल्या काही दिवसात घट होत आली आहे. मुंबईत आज 1037 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1427 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण आणि मृत्यूची संख्या कमी झाल्याने मुंबईकरांना किंचित दिलासा मिळाला आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी 345 दिवस -
मुंबईत आज 1 हजार 037 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 99 हजार 904 वर पोहचला आहे. आज 37 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 708 वर पोहचला आहे. 1 हजार 427 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 55 हजार 425 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 27 हजार 649 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 345 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 44 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 206 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 20 हजार 990 तर आतापर्यंत एकूण 61 लाख 14 हजार 937 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.