महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Police Seize Heroin : पंजाब पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी 363 कोटींचे हेरॉईन केले जप्त

पंजाब पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी 363 कोटींचे हेरॉईन जप्त केले ( Mumbai police seize heroin) आहे. दुबईमधून आलेले कंटेनरमधून हे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. प्लास्टिक कागदाच्या वेस्टनमध्ये पॅक असलेले 168 पॅकेट सापडले आहेत. आजीवली गाव येथील कंटेंनर यार्डमध्ये ही कारवाई केली आहे.

Mumbai police seize heroin worth Rs 363 crore
मुंबई पोलिसांनी 363 कोटींचे हेरॉईन जप्त केले

By

Published : Jul 15, 2022, 6:22 PM IST

Updated : Jul 15, 2022, 9:47 PM IST

मुंबई - पंजाब पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी 363 कोटींचे हेरॉईन जप्त केले ( Mumbai Police Seize Heroin ) आहे. दुबईमधून आलेले कंटेनरमधून हे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. प्लास्टिक कागदाच्या वेस्टनमध्ये पॅक असलेले 168 पॅकेट सापडले आहेत. आजीवली गाव येथील कंटेंनर यार्डमध्ये ही कारवाई केली आहे.

नवी मुंबई आयुक्त बिपीन कुमार यांची प्रतिक्रिया

362.5 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त - नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसाने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. जवळपास 362.5 कोटी रुपयांचे हेरॉईन पोलिसांनी जप्त केले. 14 जुलै रोजी नवी मुंबई पोलिसांनी नवकार लॉजिस्टिक, अजिवली, पनवेल येथील कंटेनरमधून ड्रग्ज जप्त केले.

नवी मुंबई परिसरातील अजीवली गाव येथील कंटेनर यार्ड मध्ये हेरॉईन हे ड्रग्स उतरवले जाणार असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून मिळाली त्यानुसार कारवाई केली. हा माल दुबई येथून कंटेनर मध्ये दडवून आणला होता व मुंबई, पुणे महामार्ग पनवेल येथे असलेल्या कंटेनर यार्डमध्ये ठेवण्यात आला होता. त्या कंटेनरमध्ये मार्बल ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. या मार्बल फेमची तपासणी केली असता त्यात हीरोइन नावाचा अमली पदार्थ आढळून आला.प्लास्टिक कागदाच्या वेस्टनात 168 पॅकेट पॅक केले होते. त्यात 363 कोटी रुपयांचे हेरॉईन आढळून आले.

नवी मुंबई आयुक्त बिपीन कुमार यांची प्रतिक्रिया - तस्करांनी कंटेनरच्या दोन मागील दरवाऱ्याच्या फ्रेममध्ये ड्रग्ज लपून ठेवले होते. यामध्ये त्यांनी 168 पॅकेट सापडले. या पॅकेट्स मध्ये 72 किलो 518 गॅम इतके ड्रग्ज सापडले. मुंबई क्राईम शाखेच्या आणि पंजाब पोलीसांनी मिळून ही कारवाई केली. पुढील तपास सुरु आहे अशी माहिती नवी मुंबई आयुक्त बिपीन कुमार यांनी दिली. यावेळी त्यांनी सर्व टीमचे अभिनंदनही केले.

हेही वाचा -Monsoon Update Maharashtra : राज्यात येत्या काळात पावसाचा जोर ओसरेल - डॉ. रामचंद्र साबळे

Last Updated : Jul 15, 2022, 9:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details