मुंबई -सध्या सोशल मीडियावर 'बुल्ली बाई' (Bulli Bai App Case) या App मुळे वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणातील एका संशयिताला मुंबई पोलिसाच्या सायबर सेलने (Mumbai Police Cyber Cell) सोमवारी (3 जानेवारी) बंगळुरूमधून ताब्यात घेतले (suspect detained from Bengaluru) आहे. या संशयिताला आता मुंबईला आणले जाणार आहे. हा संशयित बुल्ली बाई App ला फॉलो करणाऱ्या पाच जणांपैकी एक आहे. त्यामुळे त्याला अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- काय आहे प्रकरण?
या App वरून मुस्लिम महिलांचे तथाकथित लिलाव करण्यात येत असून त्यांचे फोटो अनधिकृतपणे वापरण्यात येत आहेत. बुल्ली बाई या अॅपवर अनेक मुस्लिम महिलांचे फोटो व्हायरल करण्यात आले.
- संशयित बंगळुरुमधून ताब्यात -
मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बुल्ली बाई App च्या संबंधित बंगळुरूमधून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. बुल्ली बाई App प्रकरणी मुंबई पोलिसांनी या संशयिताचे वय वगळता त्याची काहीच ओळख अद्याप उघड केली नाही. तसेच पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात आयपीसी आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा संशयित इंजिनियर असल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील या संदर्भात गृह विभागाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले होते. तसेच राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सायबर सेलला यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे सांगितले होते. त्यानंतर सायबर सेलकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- काय आहे बुल्ली बाई अॅप प्रकरण?