मुंबई -अभिनेता रणवीर सिंगने काही दिवासांपूर्वी न्यूड फोटो टाकल्याने खळबळ उडाली ( ranveer singh nude photoshoot ) होती. त्यावरुन त्याच्यावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठली होती. तर, काही जणांनी त्याचे समर्थन केलं होते. त्यातच आता रणवीर सिंगविरोधात आता लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. डॉ. ललित चांद यांच्यामार्फत वकील अखिलेश चौबे यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात यांनी ही तक्रार नोंदवली ( mumbai police complaint filed against Ranveer Singh ) आहे.
एका पेपर मॅगझिनसाठी रणवीर सिंगने हे फोटो सेशन केले होते. 'डाइट सब्या' नावाच्या एका अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटने रणवीर सिंगचे हे फोटो पोस्ट करण्यात आले होते. रणवीर सिंगने या पेपर मॅगझिनच्या माध्यामातून बर्ट रेनॉल्ड्सला श्रद्धांजली म्हणून इंटरनेट ब्रेक केल्याचे पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने चित्रपट आणि फॅशनबद्दलही सांगितले. जेव्हापासून हे फोटो बाहेर आले तेव्हापासून चाहत्यांनी त्याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. काहींच्या आनंददायी प्रतिक्रिया आहेत, तर काहींच्या मिश्कील प्रतिक्रिया आल्या आहेत.