महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

संवेदनशील प्रकरणात पत्रकार परिषद घेणे हा पोलिसांच्या कामाचा भाग - मुंबई पोलीस आयुक्त - मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंह

मुंबई पोलिसांनी घेतलेल्या टीआरपी घोटाळ्यासंदर्भात पत्रकार परिषदेविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ती पत्रकार परिषद कायद्याच्या चौकटीत असून ती पत्रकार परिषद मुंबई पोलिसांच्या एकंदरीत कार्यप्रणालीचा भाग असल्याचे पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी म्हटले आहे

मुंबई पोलीस आयुक्त
मुंबई पोलीस आयुक्त

By

Published : Jan 30, 2021, 10:45 AM IST

मुंबई- टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या विरोधात एआरजी आऊट लायरकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतलेली पत्रकार परिषद कायद्याच्या चौकटीत नसून केवळ रिपब्लिक वृत्तवाहिनीला बदनाम करण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बरोबरच टीआरपी संदर्भातील मुंबई पोलिसांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा, अशा प्रकारची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. यावर मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांच्याकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.

संवेदनशील प्रकरणात पत्रकार परिषद घेणे हा पोलिसांच्या कामाचा भाग

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी टीआरपी घोटाळ्यासंदर्भात घेतलेली पत्रकार परिषद ही कायद्याच्या चौकटीतच असल्याचे म्हटले आहे. तसेच ती पत्रकार परिषद मुंबई पोलिसांच्या एकंदरीत कार्यप्रणालीचा भाग असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे. आतापर्यंत टीआरपी घोटाळ्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती सर्रासपणे माध्यमांना देण्यात आलेली नाही. तसेच केवळ माध्यमांकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरेच देण्यात आल्याचेही या प्रतिज्ञापत्रात पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून नोव्हेंबर 2020 मध्ये आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अतिरिक्त आरोपपत्र हे जानेवारी 2021 या महिन्यात दाखल करण्यात आल्याचे परमबिर सिंह यांनी म्हटलेले आहे.

रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या संपादक व कर्मचाऱ्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावेत म्हणून मुंबई उच्च न्यायालयाकडे एआरजी आउट लायरकडून याचिका दाखल करण्यात आली होती. त्याला अनुसरून न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details