महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'55 पेक्षा अधिक वय असलेल्या पोलिसांनी घरी थांबा'; आयुक्तांचा आदेश - mumbai police

बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याने मुंबई पोलीस आयुक्तांनी ५५ वर्षांहून जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरी बसण्याचे आदेश दिले आहेत.

mumbai police mumbai police
'55 पेक्षा अधिक वय असलेल्या पोलिसांनी घरी थांबा'; आयुक्तांचा आदेश

By

Published : Apr 28, 2020, 11:09 AM IST

Updated : Apr 28, 2020, 2:30 PM IST

मुंबई -बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्तांनी ५५ वर्षांहून जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरी बसण्याचे आदेश दिले आहेत. काल आणखी एका पोलीस अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांनाही लागण होण्यास सुरुवात झालेली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये मुंबई पोलीस खात्यातील तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असल्यामुळे आयुक्तांनी संबंधित निर्णय घेतला आहे. याला अनुसरून मुंबई पोलीस आयुक्त परमविर सिंह यांनी ही 55 पेक्षा अधिक वय असलेल्या अधिकाऱयांना घरातच थांबण्याचे आदेश दिले आहे.

मुंबई पोलीस खात्यातील शिवाजी सोनावने (वय -56) या कर्मचाऱ्याचा काल(२७ एप्रिल) उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर याआधी चंद्रकांत गणपत पेंदूरकर (वय -57) , संदिप महादेव सुर्वे (वय- 52) या पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. गेल्या 3 दिवसात तीन कर्मचाऱ्याचा मृत्यूने आज मुंबई पोलीस आयुक्तांनी हा आदेश जारी केला आहे.

दरम्यान, राज्यभरात १६ अधिकाऱ्यांसह १२० पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून आठ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलाय. तर, तिघांचा मृत्यू झाल्याने सध्या १०९ पोलीस पॉझिटिव्ह आहेत.

Last Updated : Apr 28, 2020, 2:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details