महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोव्यात घडलेल्या खुनाच्या आरोपींना मुंबई पोलिसांनी केली 48 तासात अटक

गोव्यामधील फातोर्डा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 7 मार्च रोजी मिंगल मिरांडा (68) व केथरिंग पिंटू (86)या दोन ज्येष्ठ नागरिकांचा डोक्यात लोखंडी घण घालून हत्या करण्यात आल्याचा गुन्हा घडलेला होता.

police station
पोलीस स्टेशन

By

Published : Mar 9, 2021, 7:21 PM IST

मुंबई - गोव्यामधील फातोर्डा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 7 मार्च रोजी मिंगल मिरांडा (68) व केथरिंग पिंटू (86)या दोन ज्येष्ठ नागरिकांचा डोक्यात लोखंडी घण घालून हत्या करण्यात आल्याचा गुन्हा घडलेला होता. या संदर्भात फोटोर्डा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर यातील तीन आरोपींचा पोलीस शोध घेत होते. हे तिन्ही आरोपी गोवा राज्याबाहेर पळून गेले असल्याचे समोर आल्यानंतर त्यांची छायाचित्र ही गोवा पोलिसांकडून प्रसारित करण्यात आली होती.

हेही वाचा -कांदा, लसूण, मसाला फोडणीसह कालव्याचा रस्सा ही पर्यटकांसाठी पर्वणी

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी रवीन कुमार श्याम (18) कुमार सादा आकाश अजय कुमार घोष (20) व आदित्यकुमार रमेश खारवाल (18) हे तीन आरोपी आरोपी मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, दादर टर्मिनल, कुर्ला टर्मिनल, वडाळा रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये फिरत असताना ते शिवाजी पार्क परिसरात आले असतात पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांची चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी सदर च्या ज्येष्ठ नागरिकांचा खून केल्याचा कबुलीजबाब दिला आहे.

या प्रकरणातील मृत मिंगल मिरांडा व केथरिंग पिंटू या दोघांकडे कामाचे पैसे बाकी असल्यामुळे या तिघांनी मिळून या दोन ज्येष्ठ नागरिकांचा लोखंडी घन डोक्यात मारून हत्या केली होती. मुंबईत आल्यानंतर हे तिन्ही आरोपी झारखंड ला पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र केवळ 48 तासांच्या आत गोवामध्ये घडलेल्या गुन्ह्याचा शोध घेत आरोपीना अटक मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने केली आहे.

हेही वाचा -नाराज संग्राम विधानसभा अध्यक्ष होणार ?

ABOUT THE AUTHOR

...view details