महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सीएसएमटी परिसरात 5 लाखाचे बनावट नोटा सहा दोन आरोपींना मुंबई पोलिसांकडून अटक - सीएसएमटी परिसरात 5 लाखाचे बनावट नोटा

पोलिसांनी आरोपींकडून 2000 रुपयांच्या 255 नकली नोटा जप्त केल्या. आरोपींच्या प्राथमिक चौकशीत असं दिसून आले आहे, की सिद्दीकी प्रिंटर वापरुन घरीच बनावट नोटा तयार करायचा आरोपींकडून प्रिंट मशीन जप्त केला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाले आहे. आरोपी अर्शद मोहम्मद सिद्दीकी हा उत्तर प्रदेश मधील राहणारा असो दुसरा आरोपी लवेश सीताराम तांबे ठाण्यातील कळवा येथील राहणारा आहे. या टोळीची आणखी कुणाचा संबंध आहे का या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे. दोघांनाही न्यायालयात हजर केलं असता त्यांना 23 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

mumbai police arrested six accused in fake rs 5 lakh notes in cst area
सीएसटी परिसरात 5 लाखाचे बनावट नोटा सहा दोन आरोपींना मुंबई पोलिसांकडून अटक

By

Published : May 17, 2022, 4:18 PM IST

मुंबई - मुंबई पोलिसांकडून बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीला अटक केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जवळ 5 लाख 10 हजार रुपये बनावट टोळीकडून जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या क्राईम युनिटने सोमवारी दोन आरोपींना अटक केली आहे. अर्शद मोहम्मद सिद्दीकी (42) उत्तर प्रदेश आणि लवेश सीताराम तांबे (41) अशी आरोपींची नावं आहेत.


तांबे लाही घटनास्थळावरुन ताब्यात - छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसजवळ एक व्यक्ती बनावट चलनी नोटांची खेप देण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलीस पथकाने या ठिकाणी सापळा रचून लवेश तांबे याला बनावट नोटा देण्यासाठी आलेल्या अर्शद सिद्दिकीला पकडलं. तसंच तांबे लाही घटनास्थळावरुन ताब्यात घेण्यात आलं.


आरोपींकडून प्रिंट मशीन जप्त - बनावट चलनी नोटा खऱ्या म्हणून वापरल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या कलम 489 (A) आणि (b) अन्वये आणि गुन्हेगारी कट रचल्याबद्दल 120 ब अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बनाावट नोटा छापायचे आणि खऱ्या दिसाव्यात यासाठी त्या घाण करायचे. पोलिसांनी आरोपींकडून 2000 रुपयांच्या 255 नकली नोटा जप्त केल्या. आरोपींच्या प्राथमिक चौकशीत असं दिसून आले आहे, की सिद्दीकी प्रिंटर वापरुन घरीच बनावट नोटा तयार करायचा आरोपींकडून प्रिंट मशीन जप्त केला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाले आहे. आरोपी अर्शद मोहम्मद सिद्दीकी हा उत्तर प्रदेश मधील राहणारा असो दुसरा आरोपी लवेश सीताराम तांबे ठाण्यातील कळवा येथील राहणारा आहे. या टोळीची आणखी कुणाचा संबंध आहे का या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे. दोघांनाही न्यायालयात हजर केलं असता त्यांना 23 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details