मुंबई -काळबादेवी येथे शनिवारी रात्री ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्याच्याशी काही चोरट्यांनी वाद घालून त्याची 44 लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे आणि दागिने असलेली बॅग हिसकावून पळ काढल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पायधुनी पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली असून चोरी करणाऱ्या गॅंगला राजस्थान मधून 48 तासात जेरबंद केले आहे. या टोळीकडून 44 लाख 50 हजार रुपयांचा 890 ग्राम सोने जप्त करण्यात आले आहे.
44 लाखांच्या चोरीचा 48 तासात खुलासा, आरोपी थेट राजस्थानातून अटकेत - mumbai police news
ज्वेलर्सच्या दुकानातील कर्मचाऱ्यांशी वाद घालून चौघांनी एका व्यक्तीकडून सोन्याची बिस्किटे आणि दागिन्यांनी भरलेली बॅग लुटली. पीडित व्यक्तीचा चार चोरट्यांनी पाठलाग केला आणि नंतर काही गोष्टीवरून त्याच्याशी वाद घातला. यादरम्यान चोरट्यांनी कर्मचाऱ्याची सोन्याची बिस्किटे आणि दागिने असलेली 44 लाख रुपयांची बॅग हिसकावून तेथून पसार झाले. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह इतर तीन आरोपींना राजस्थानमधून अटक केली. आरोपींकडून चोरीचा 95 टक्के सोन्याची मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून शोध - या प्रकरणातील आरोपीचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी शोध घेतला. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह इतर तीन आरोपींना राजस्थानमधून अटक केली. आरोपींकडून चोरीचा 95 टक्के सोन्याची मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सोन्याची बिस्किटे आणि दागिन्यांनी भरलेली बॅग लुटली -काळबादेवी परिसरातून चोरीचा धक्कादायक प्रकार घडला होता. जिथे एका ज्वेलर्सच्या दुकानातील कर्मचाऱ्यांशी वाद घालून चौघांनी एका व्यक्तीकडून सोन्याची बिस्किटे आणि दागिन्यांनी भरलेली बॅग लुटली. पीडित व्यक्तीचा चार चोरट्यांनी पाठलाग केला आणि नंतर काही गोष्टीवरून त्याच्याशी वाद घातला. यादरम्यान चोरट्यांनी कर्मचाऱ्याची सोन्याची बिस्किटे आणि दागिने असलेली 44 लाख रुपयांची बॅग हिसकावून तेथून पसार झाले. याप्रकरणी पायधोनी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.