मुंबई - बोरवली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी एका अशा टोळीचा छडा लावला, जी दिल्लीतून येऊन मुंबई शहरात सोनसाखळी चोरी करत होती. याप्रकरणी पोलिसांनी पिता पुत्रासह तीन आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींकडून तब्बल 7 लाख रुपयांचे सोन्याचे 200 ग्राम चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले.
मुंबईत सोनसाखळी चोरणाऱ्या दिल्लीतील पितापुत्रासह 3 जणांना अटक - मुबंई बातमी
दिल्लीत वेगवेगळे काम करणाऱ्या तीन जणांच्या टोळीने गेल्या काही महिन्यात मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळीची चोरी केली होती. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी आतापर्यंत सात लाख रुपयांची सोनसाखळी चोरी केल्याचे उघड झाले. अटक आरोपी दिल्लीवरून ट्रेनने मुंबईत दाखल होत असत.
दिल्लीत वेगवेगळे काम करणाऱ्या तीन जणांच्या टोळीने गेल्या काही महिन्यात मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळीची चोरी केली होती. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी आतापर्यंत सात लाख रुपयांची सोनसाखळी चोरी केल्याचे उघड झाले. अटक आरोपी दिल्लीवरून ट्रेनने मुंबईत दाखल होत असत. बोरवली स्थानकावर उतरल्यानंतर एखादी दुचाकी विकत घेत. त्यानंतर या दुचाकीवरून मुंबईतल्या निर्मनुष्य परिसरामध्ये गस्त घालत फिरायचे. ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून मिळालेला माल घेऊन हे तिन्ही आरोपी दिल्लीला ट्रेनने पळून जायचे .
या टोळीने मुंबईतील चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार गुन्हे, कसूर कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा, तर बोरीवली एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा केलेला आहे. पोलिसांनी यासंदर्भात राजकुमार घाशीराम मालावत (51) आशु राजकुमार मालावत (23) सुनील जनरेलसिंग राजपूत (30) या आरोपींना अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी नवी दिल्लीतील मंगोलीपूर येथील रहिवासी आहेत.