महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ईशान्य मुंबईचे भाजप उमेदवार मनोज कोटक २ लाख २६ हजार ४८६ मतांनी विजयी - manoj kotak

भाजपने विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली होती. कोटक हे उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातून २ लाख २२ हजार मतांनी विजयी झाले आहे.

कोटक आणि पाटील यांच्यात काटे की टक्कर

By

Published : May 23, 2019, 6:05 AM IST

Updated : May 23, 2019, 6:05 PM IST

मुंबई- मुंबईचा उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून भाजप उमेदवार मनोज कोटक यांनी याठिकाणी बाजी मारली आहे. इथे त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील यांच्याशी होती. भाजपने विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून कोटक यांना उमेदवारी दिली होती.

LIVE :
वेळ -

  • 5.51 - मनोज कोटक 514599, संजय पाटील 288113 तर, निहारिका खोंदले (वंचित बहुजन आघाडी) 68249
  • 2.23 - मतमोजणीची फेरी 16 - संजय पाटील (राष्ट्रवादी) 11278 एकूण - 233610, मनोज कोटक (भाजप) - 22032 एकूण - 411231
  • 12.04 - 11व्या फेरीत मनोज कोटक 1 लाख 27 हजार मतांनी पुढे
  • 10.40 - मनोज कोटक 9 फेरीत मनोज कोटक 1 लाख 2 हजार मतांनी पुढे
  • 10.09 - भाजपचे मनोज कोटक 6 व्या फेरीत 34 हजार मतांनी आघाडीवर
  • 9.41 - मनोज कोटक 19200 मतांनी आघाडीवर
  • - मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीला सुरुवात
  • 9.20 - भाजपचे मनोज कोटक 13900 मतांनी आघाडीवर
  • 8.32 - वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार निहरिका खोदले सकाळीच मतमोजणी केंद्रावर उपस्थित
  • 8.20 - पोस्टल मतमोजणी सुरू
  • 8 - ईशान्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

२०१४ ची परिस्थिती -

ईशान्य मुंबई हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून भाजपचे किरीट सोमय्या खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. २०१४ ला नरेंद्र मोदी यांची लाट होती. या लाटेचा फायदा सोमय्या यांना झाला. सोमय्या यांना ५ लाख २५ हजार २८५ मते मिळाली होती. तर संजय पाटील यांना २ लाख ८ हजार १६३, आपच्या मेधा पाटकर यांना ७६ हजार ४५१, बसपाचे मछिंद्र चाटे यांना १७ हजार ४२७ मते मिळाली होती. तर ७ हजार ११४ मतदारांनी नोटाचा वापर केला होता.

भाजपचा खासदार पुन्हा मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प भाजपने केला आहे. भाजप आणि शिवसेनेची युती असली तरी या विभागात शिवसेनेकडून भाजपला म्हणावी तशी मदत होताना दिसत नाही. त्यातच शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, अशोक पाटील यांचे संजय पाटील खासदार होतील असे विधान केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. किरीट सोमय्या यांचाही व्हिडिओ वापरून राष्ट्रवादी प्रचार करत असल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे दाखल झाली होती. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक चांगलीच गाजली होती. आता या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे.

Last Updated : May 23, 2019, 6:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details