मुंबई -राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची मानधनात वाढ करण्याची मागणी योग्य असून भाजप शिवसेना सरकारने पाच वर्षात त्यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षताच दिल्याचा आरोप करत काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास त्यांच्या मानधनात पाच हजार रुपयांची वाढ करु, असे आश्वासन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.
हेही वाचा... माणूस आरक्षणाने नाही, तर कर्तृत्वाने मोठा होतो - नितीन गडकरी
राज्यातील ६४ हजार आशा स्वयंसेविका आपल्या मागण्यांसाठी राज्याच्या अनेक भागात आंदोलन करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी मतदार संघात आशा स्वयंसेविकांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन आपल्या समस्या व मागण्या त्यांच्या समोर मांडल्या. तुटपुंज्या मानधनावर काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी वडेट्टीवार यांनी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मागण्या योग्य असून आघाडी सरकार सत्तेवर आल्यास पाच हजार रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे.