मुंबई -देशाची अर्थव्यवस्था आज अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे. भारतात आज 70 वर्षातील सर्वात मोठे आर्थिक संकट आहे, असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी स्वतः म्हटले होते. यानंतर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन नोटबंदीनंतरच देशात भ्रष्टाचार वाढल्याची कबूली दिली. याच वक्तव्याचा आधार घेऊन सामनाने अग्रलेखात देशात सद्या असलेली मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीतच असल्याची थेट टीका केली आहे.
देशातील मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीतच; सामनातून सरकारवर थेट बाण! सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे...
सीतारामन यांनी नोटबंदीनंतरच्या भ्रष्टाचाराचे दाखले द्यायला हवेत
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषदेत, देशात नोटबंदीनंतर भ्रष्टाचार अधिक वाढल्याची कबूली दिली. यावर सामनाने भ्रष्टाचार हा नोटबंदीनंतरचा म्हणजेच मागील साडेतीन वर्षाच्या काळातील असल्यास, अर्थमंत्र्यांनी हा भ्रष्टाचार नेमका कोणी,कधी केला, त्यांच्यावर काय कारवाई झाली हे देखील सांगायला हवे होते, असे म्हटले आहे.
मोदी राजवटीत काळा पैसा भारतात आलाच नाही..
पंतप्रधान मोदी हे पै-पै वसूलीची भाषा करतात पण सीतारमन यांनी सांगितला तो भ्रष्टाचार हा नोटबंदीनंतरचा आहे. नव्या राजटीत काही काळा पैसा भारतात आला नाही, उलट बँका बूडवणारे अनेक उद्योगपती देश सोडून देशाबाहेर गेल्याची टिका सामनातून करण्यात आली आहे.
नोटबंदीनंतर देशातील चलनातील रोकड वाढली, याचा संबंध बेकायदेशीर कामांशी आहे
4 नोव्हेंबर 2016 ला देशात 17,174 बिलिसन रुपये चलनात होते, नोटबंदीनंतर 29 मार्च 2019 ला हा आकडा 21,137 बिलियन इतका आहे. याचा अर्थ नोटबंदीनंतर चलनातील रोकड वाढली असून याचा थेट संबंध बेकायदेशीर कामांशी आहे, असे सामनातून मांडण्यात आले आहे.
मोदींच्या नव्या भारतातच 2 कोटी लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या
मोदींनी "नवा भारत" म्हणजे "Modern India" ची घोषणा केली होती. या नव्या भारतात सर्वांची काळजी घेणे आवश्यक होते, मात्र गेल्या दोन वर्षांतच 2 कोटींपेक्षा जास्त लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. लोकांच्या घररातील चुली विझल्या आहेत.
देशाच्या अर्थव्यवस्थेचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार?
बिहारचे माजी मुख्यंमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे निधनानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्यांना रिवाजाप्रमाणे 21 बंदूकींच्या गोळ्या हवेत झाडून सलामी देण्यात आली नाही. हा धागा पकडून सामनाने सरकारवर तिरकस टीका केली आहे. बंदूकीचा चाप हातात पकडूनही गोळी न झाडल्या प्रमाणे देशाची अर्थव्यवस्था ही देखील फसलेल्या सलामी सारखीच झाली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरू आहेत काय? अशा प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.