मुंबई - एखाद्याचा मृत्यू झाला आणि त्याचे नातेवाईक घरापासून लांब असल्यास मृतदेहावर लवकर अंत्यसंस्कार करता येत नाहीत. अशा वेळी तो मृतदेह शीतगृहात ठेवावा लागतो. मात्र, शीतगृहांमध्ये जागा नसल्यास नागरिकांची अडचण होते. मुंबईकरांची ही अडचण दूर व्हावी म्हणून महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये शीत शवपेट्या (डेड बॉडी फ्रीजर) उपलब्ध करून देण्याची मागणी, राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी केली होती. ही मागणी पालिकेच्या आरोग्य विभागाने मंजूर केल्याने मुंबईकरांना आता पालिका रुग्णालयात नाममात्र दरात शीत शवपेट्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
पालिका रुग्णालयात शीत शवपेट्या उपलब्ध केल्या जाणार - mobile morgues
यासाठी मुंबईकरांकडून नाममात्र दर आकाराला जाणार असून मुंबईकरांना शवपेटीची गरज भासल्यास त्या त्वरित उपलब्ध करता याव्यात म्हणून शवपेट्यांची जबाबदारी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांकडे दिली जावी, अशी सूचना सईदा खान यांनी केली आहे.
mumbai municipality to avail mobile morgues in hospitals
आता स्थायी समिती व सभागृहाच्या मंजुरीनंतर सर्वच पालिका रुग्णालयांमध्ये शीत शवपेट्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी मुंबईकरांकडून नाममात्र दर आकाराला जाणार असून, मुंबईकरांना शवपेटीची गरज भासल्यास त्या त्वरित उपलब्ध करता याव्यात म्हणून शवपेट्यांची जबाबदारी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांकडे दिली जावी, अशी सूचना सईदा खान यांनी केली आहे.