मुंबई -बऱ्याच काळापासून मेट्रो तीनची उत्सुकता जनतेला लागली होती. ती आता फलद्रूप होणार असे दिसते आहे. मुंबई महानगर रेल्वे कॉर्पोरेशनच्या संचालिका अश्विनी भिडे ( Ashvini Bhide MD Of Metro ) यांनी ई टीव्ही भारतला याबाबतची माहिती दिली. येत्या ऑगस्ट २०२२ मध्ये मुंबई मेट्रो तीनची ( Mumbai Metro 3 ) पहिली प्रोटोटाइप ट्रेन ( prototype train ) येईल, असे त्या म्हणाल्या.
मेट्रो कामांच्या प्रगतीचा आढावा -मुंबई महानगर रेल्वे कॉर्पोरेशनच्या संचालिका अश्विनी भिडे यांनी मेट्रोच्या सारीपूत नगर स्थानक येथील ट्रेन वितरण क्षेत्रांची पाहणी केली आणि स्थानके, बोगदे व यंत्रणांच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला ( Reviewed Metro work ). मेट्रो तीनच्या कामांची प्रगती संदर्भात आणि पाहणी संदर्भात ईटीव्ही शी बोलताना त्यांनी सर्व माहिती दिली. त्या म्हणाल्या कि '' मुंबई मेट्रो तीनची पहिली प्रोटोटाइप ट्रेन हि आगस्ट २०२२ मध्ये सुरु होईल. सुरुवातीच्या डिझाईनची क्षमता सिद्ध करणारी हि चाचणी बोगद्याच्या आत घेतली जाईल. जेणेकरून मेट्रोची क्षमता नीट पाहिली जाईल.'
विश्वासाला मेहनतीने न्याय देण्याचा प्रयत्न - मुंबई महानगर रेल्वे कॉर्पोरेशनच्या संचालिका अश्विनीने भिडे यांनी बोगद्यासह ट्रेन रिसीव्हिंग सुविधेला भेट दिली आणि सहकाऱ्यांसोबत स्टेशन्सच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मेट्रोच्या पुनर्नियुक्ती पदाबाबत आनंद व्यक्त केला. त्या पुढे म्हणाल्या, एमडी एमएमआरसीएल ( Mumbai Metropolitan Railway Corporation ) या पदावर माझी पुनर्नियुक्ती झाल्याबद्दल अनेकांनी मला दिलेल्या आशीर्वाद आणि हार्दिक शुभेच्छांबद्दल मी अत्यंत आभारी आहे. त्यांचा माझ्यावर आणि आमच्या एमएमआरसीएल टीमवरील प्रेम आणि विश्वास आहे . ज्यामुळे आमची उर्जा आणि मनोबल वाढते. त्यांच्या विश्वासाला आमच्या मेहनतीने न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील.