मुंबई - मुंबई मेट्रोने (२०१३)पासून मालमत्ता कराचे ११७ कोटी ६२ लाख रुपये थकवले आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या के-पूर्व आणि के-पश्चिम विभाग कार्यालयातील करनिर्धारण व संकलन विभागाने मुंबई मेट्रोच्या संबंधित मालमत्तांवर जप्तीची नोटीस बजावली आहे. (Mumbai Metro property tax) के-पूर्वच्या हद्दीत सहा, तर के-पश्चिमच्या हद्दीतील पाच मालमत्तांचा समावेश आहे. यात आठ मेट्रो रेल्वे स्टेशनचा समावेश आहे.
मालमत्ता कर थकवला -
मुंबई महापालिकेला जकात करामधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत होता. (Mumbai Municipal Corporation) जकात कर रद्द होऊन जीएसटी कर लागू झाला. यामुळे पालिकेने आपले उत्पन्न वाढवण्यासाठी मालमत्ता कर वसुलीकडे विशेष लक्ष दिले आहे. मालमत्ता कर न भरणाऱ्या संस्था, व्यक्ती यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबई मेट्रोने (२०१३)पासून आतापर्यंत ११७ कोटी ६२ लाख रुपये मालमत्ता कर थकवला आहे. हा कर भरण्यासाठी पालिकेने मेट्रोला नोटीस बजावली होती.
आठ रेलवे स्थानकांचा समावेश -