महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मेट्रोला सहावं वरीस लागलं; मुंबईकर म्हणतात...

सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीचा हा पहिला मेट्रो प्रकल्प आहे. ज्याने मागील ५ वर्षात ५४ कोटीहून अधिक प्रवाशांना लाभ दिला आहे. मुंबईच्या वाहतूक कोंडीमुळे अधिक प्रवाश्यांनी या मेट्रोला पसंदी दिली आहे.

मेट्रोला सहावं वरीस लागलं; मुंबईकर म्हणतात...

By

Published : Jun 9, 2019, 7:46 PM IST

मुंबई- मुंबई मेट्रो १ ने ५ वर्ष पूर्ण केले असल्याने मेट्रोच्या सर्वच स्थानकावर रंगीबेरंगी सजावट करण्यात आली आहे. यावेळी मेट्रो स्थानकावरील तिकीट खिडक्या आणि स्थानकात जातेवेळी आकर्षक सजावट केली असल्याने प्रवासीही समाधानी असल्याचे दिसत होते.

लोकल व बेस्टच्या बेभरवशाच्या वेळेला कंटाळलेल्या प्रवाशांना घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावर धावणाऱ्या मुंबईतील पहिल्या मेट्रोचा चांगला अनुभव येत आहे. मेट्रोच्या फेऱ्यांमधील असलेले सातत्य, स्थानकावर व गाडीत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण, प्रवाशी सुरक्षेची घेतलेली काळजी, स्थानक परिसर व गाड्यातील स्वच्छता, स्वयंचलीत असलेली कार्यप्रणाली, यामुळे मुंबई मेट्रो १ ला सुरुवातीपासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. घाटकोपर ते वर्सोवा मार्गावरून दररोज साडेतीन लाख प्रवासी करतात, यात वर्षागणिक वाढ होत आहे.

मेट्रोला सहावं वरीस लागलं; मुंबईकर म्हणतात...

सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीचा हा पहिला मेट्रो प्रकल्प आहे. ज्याने मागील ५ वर्षात ५४ कोटीहून अधिक प्रवाशांना लाभ दिला आहे. मुंबईच्या वाहतूक कोंडीमुळे अधिक प्रवाश्यांनी या मेट्रोला पसंदी दिली आहे. १२ स्थानके असलेल्या या मेट्रोला ११.४० किमीचा टप्पा असून ६ कोटी १७ लाख फेऱ्या मारत पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडले गेला. त्यामुळेच अधिक प्रवासी या मेट्रोला पसंदी देत आहेत. मागील ५ वर्षे चांगली सेवा देणारी मेट्रो यापुढे अधिक फेऱ्या आणि डबे वाढवत चांगली सेवा देईल हीच अपेक्षा मुंबईकर व्यक्त करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details