महाराष्ट्र

maharashtra

...तर मुंबईतील 'लोकल' सेवा पुन्हा बंद होऊ शकते - राजेश टोपे

By

Published : Mar 23, 2021, 10:26 PM IST

राज्यात कोरोना वाढत आहे, महानगरात रुग्ण संख्येचा उच्चांक होत आहे. मुंबईत तर दिवसाला तीन हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे लोकल सेवा बंद करावी का? यावर बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. अशी माहिती आरोग्यामंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजेश टोपे
राजेश टोपे

मुंबई-राज्यात कोरोना वाढत आहे, महानगरात रुग्ण संख्येचा उच्चांक होत आहे. मुंबईत तर दिवसाला तीन हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे लोकल सेवा बंद करावी का? यावर बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. अशी माहिती आरोग्यामंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील सर्वसामान्यांची लाईफलाईन असलेल्या लोकलवर पुन्हा निर्बंध येऊ शकतात. राज्य सरकारकडून कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र राज्यात तरी देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. याचाच अर्थ नागरिक कोरोना नियमांचे पालन करत नाही असा होतो. मात्र नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे, मास्क घातले पाहिजे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायला हवे, अन्यथा पुन्हा एकदा लोकलबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल असा इशारा यावेळी राजेश टोपे यांनी दिला आहे.

होळी साजरी करण्यावरही निर्बंध

होळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. मात्र राज्यात वाढणारी रुग्ण संख्या पाहता होळीवर देखील निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे. यासंबंधी लवकरच नियमावली जाहीर करू, अशी माहिती देखील यावेळी राजेश टोपे यांनी दिली आहे.

हेही वाचा -कोरोना रुग्णांचा आकडा मोठा; खाटांची संख्या कमी पडू लागली

हेही वाचा -शब-ए-बारात संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

ABOUT THE AUTHOR

...view details