मुंबई-भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडूनही दिलासा ( Mumbai High Court on Girish Mahajan case ) मिळाला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे संबंधित पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात पुढील सुनावणी 24 जानेवारीला होणार आहे.
भाजपचे आमदार गिरीश महाजन ( BJP MLA Girish Mahajan in trouble) यांच्यावर पुण्यात असलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले होते. ( Pune Police Team in Jalgaon ) जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात ( Kothrud Police Station probe of Girish Mahajan ) गुन्हा दाखल आहे.
जळगावस्थित शिक्षण संस्थेमध्ये वर्चस्वासाठी वाद सुरू आहे. गिरीष महाजनांच्या सांगण्यावरून धमकावल्याचा याचिकार्त्यांच्या आरोप आहे. या प्रकरणी पुण्यातील कोथरुड पोलीस चौकशी करत ( case against Girish Mahajan ) आहेत.
हेही वाचा-Supreme Court On Suspended MLA : सर्वोच्च न्यायालयाचा भाजपच्या १२ आमदारांना झटका, निलंबन कायम