महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत पालिकेच्या 4 प्रभागात पोटनिवडणूक घेण्यास हायकोर्टाची स्थगिती - bypoll election

या प्रकरणात काही याचिका अद्याप प्रलंबित असल्याने राज्य निवडणूक आयोग अशाप्रकारे निवडणूक जाहीर करू शकत नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

मुंबईत पालिकेच्या 4 प्रभागात पोटनिवडणूक घेण्यास हायकोर्टाची स्थगिती

By

Published : May 19, 2019, 12:38 PM IST

मुंबई- जात प्रमाणपत्र अवैद्य ठरल्याने 4 नगरसेवकांना त्यांचे पद गमवावे लागल्यानंतर या जागांवर पोटनिवडणूक जाहीर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 4 नगरसेवकांचे पद रद्द झाल्याने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नगरसेवकांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत त्यांनी प्रभाग क्रमांक 76, 32, 81, व 28 या जागांवर आपला नगरसेवक पदाचा हक्क सांगितला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती निझामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठासमोर ही याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणात काही याचिका अद्याप प्रलंबित असल्याने राज्य निवडणूक आयोग अशाप्रकारे निवडणूक जाहीर करू शकत नाही. अशाप्रकारे आकस्मिकपणे निवडणुका जाहीर केल्यास याचिकादारांच्या कोर्टातील प्रलंबित दाव्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असेही याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. यावर सुनावणी घेत मुंबई उच्च न्यायालयाने आयोगाला 12 जूनपर्यंत निवडणुका जाहीर करण्यास मनाई केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details