महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गौतम नवलखांची मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा नाही, नजरकैदेत ठेवणारी याचिका फेटाळली - गौतम नवलखांची नजरकैदेत ठेवणारी याचिका फेटाळली

तळोजा कारागृहात अपुऱ्या वैद्यकीय सुविधा असल्यामुळे तातडीने आणि योग्य उपचार होऊ शकत नाही. त्यामुळे मला घरीच नजरकैदेत ठेवावे, अशी मुख्य मागणी करणारी याचिका त्यांनी उच्च न्यायालयात केली होती. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत न्या. एस. बी. शुक्रे आणि न्या. जी. ए. सानप यांच्या खंडपीठाने राखून ठेवलेला निकाल मंगळवारी जाहीर केला.

mumbai high court rejects gautam navalkhas plea for detention
गौतम नवलखांची मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा नाही

By

Published : Apr 27, 2022, 3:44 PM IST

मुंबई -भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी आणि लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखांचे वाढते वय आणि आजारांमुळे घरात नजरकैदेत ठेवावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिका सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

तळोजा कारागृहात अपुऱ्या वैद्यकीय सुविधा-नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन गौतम नवलखांसह इतर काही जणांविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला. नवलखांना 28 ऑगस्ट 2018 ला अटक करण्यात आली. तेव्हापासून नवलखा तळोजा कारागृहातील अंडा सेलमध्ये आहेत. नवलखांचे वाढते वय आणि आजारांमुळे घरात नजरकैदेत ठेवावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. तळोजा कारागृहात अपुऱ्या वैद्यकीय सुविधा असल्यामुळे तातडीने आणि योग्य उपचार होऊ शकत नाही. त्यामुळे मला घरीच नजरकैदेत ठेवावे, अशी मुख्य मागणी करणारी याचिका त्यांनी उच्च न्यायालयात केली होती. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत न्या. एस. बी. शुक्रे आणि न्या. जी. ए. सानप यांच्या खंडपीठाने राखून ठेवलेला निकाल मंगळवारी जाहीर केला.

विशेष NIA न्यायालयात अर्ज करण्याचे निर्देश -नवलखा यांनी वैद्यकीय सुविधांबाबत विशेष NIA न्यायालयात अर्ज करावा, असे निर्देश न्यायालयाने आपल्या आदेशात दिले आहेत. तसेच नवलखा यांना आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधा तळोजा कारागृह अधिक्षकांनी उपलब्ध करुन द्याव्यात, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

काय आहे भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरण -पेशव्यांचं मराठा सैन्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200 व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 ला भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केले होते. या युद्धात पेशव्यांविरोधात ईस्ट इंडिया कंपनीबरोबर महार रेजिमेंट लढली होती आणि यात बहुतांश दलित सैनिक होते. त्यांना अभिवादन करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

एल्गार परिषदेतील वक्तव्य कारणीभूत - पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 ला दंगल झाली होती आणि त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. या हिंसाचाराला एक दिवस अगोदर म्हणजे 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदे तील वक्तव्यं कारणीभूत होती अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला. या एल्गार परिषदे मागे माओवादी संघटनांचा हात होता असं म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केले.

ABOUT THE AUTHOR

...view details