मुंबई -वेंकटेश्वरा क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित "व्ही" नावाचा तेलगू चित्रपट आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्ममधून काढून टाकण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने अॅमेझॉन प्राइम व्हिडिओला दिले आहेत. मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री साक्षी मलिक (फिर्यादी) यांनी दाखल केलेल्या दिवाणी मानहानी खटल्यात व्ही चित्रपटाच्या व्हिडिओमध्ये आपले अवैधरित्या फोटो वापरले असल्याचा दावा केला आहे. हे फोटो काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्रीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा.. - साक्षी मलिक
वेंकटेश्वरा क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित "व्ही" नावाचा तेलगू चित्रपट आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्ममधून काढून टाकण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने अॅमेझॉन प्राइम व्हिडिओला दिले आहेत. मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री साक्षी मलिकने व्ही चित्रपटाच्या व्हिडिओमध्ये आपले अवैधरित्या फोटो वापरले असल्याचा दावा केला आहे.
न्यायमूर्ती जी.एस. पटेल यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाला निरीक्षणात दिसून आले की, साक्षी मलिक यांच्या वतीने केलेल्या युक्तिवादात तथ्य असल्याचे लक्षात आले तसेच साक्षीच फोटो गैररित्या तिच्या परवानगीशिवाय वापरण्यात आल्याचं आढळले. त्यामुळे कोर्टाने आदेश दिले की, चित्रपटातून फिर्यादीचे सर्व फोटो पूर्णपणे हटविली जाईपर्यंत कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करू नये.
अॅमेझॉन प्राइमवर पुन्हा चित्रपट रिलीज करण्यापूर्वी निर्मात्यांना चित्रपटातील छायाचित्रे काढावी लागतील, असे कोर्टाने आदेश दिले आहेत. कोर्टाने त्या संदर्भातील आदेश जाहीर केल्यानंतरच हे करता येईल. या चित्रपटाच्या काही दृश्यात साक्षी मलिकचे फोटो वापरले गेले होते. ज्यात साक्षी मलिक वेश्या व्यवसाय करताना संदर्भ दिलेला आहे. साक्षी मलिकने असा दावा केला की, चित्रपटामध्ये दाखविलेले फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून घेतले गेले आहेत. त्यांनतर मलिक यांनी तिच्या वकिलांमार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली.