मुंबई -आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याच्या ( INS Vikrant Case ) आरोप प्रकरणी भाजप नेते किरीट सोमैया यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आपल्याला अटक होऊ यासाठी सोमैया यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण, त्यांनी तो फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी (दि. 12 एप्रिल) मंजूर केला ( Interim Bail to Kirit Somaiya ) आहे. या प्रकणाची पुढील सुनावणी 28 एप्रिल रोजी होणार आहे.
Interim Bail to Kirit Somaiya : मुंबई उच्च न्यायालयाचा किरीट सोमैया यांना दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर - आयएनएस विक्रांत निधी घोटाळा
आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याच्या ( INS Vikrant Case ) आरोप प्रकरणी भाजप नेते किरीट सोमैया यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आपल्याला अटक होऊ यासाठी सोमैया यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण, त्यांनी तो फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी (दि. 12 एप्रिल) मंजूर केला ( Interim Bail to Kirit Somaiya ) आहे.
चौकशीसाठी सहकार्य करण्याच्या सूचना -मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) हा जामीन अर्ज मंजूर करताना 57 कोटी रुपये जमल्याचा आरोप तक्रारदाराने कशाच्या आधारे केला, याबाबत तक्रारीत उल्लेख नाही, अशी टिप्पणी केली. तसेच 18 एप्रिलपासून चार दिवस दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेच्या ( EOW ) कार्यालयात जाऊन पोलिसांना चौकशीत सहकार्य करावे, अशी सूचना सोमैया यांना उच्च न्यायालयाने देत जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी अटक केल्यास 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
हेही वाचा -Kirit Somaiya : ठाकरे सरकारच्या 'डर्टी डझन'ला शिक्षा होईपर्यंत लढा सुरूच राहील : किरीट सोमैया