मुंबई -कोस्टल रोडचं बांधकाम सध्या सुरू आहे. हायकोर्टात एक याचिका दाखल झाली होती. या याचिकेमुळं कोस्टल रोडच्या बांधकामाला अडथळा निर्माण झाला होता. बांधकामासाठी दक्षिण मुंबईतील टाटा गार्डन येथील झाडे तोडण्यास विरोध करणारी याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. विकासकामा दरम्यान अशा याचिका करुन अडथळा निर्माण करता येणार नसल्याचं कोर्टाकडून सांगत याचिका फेटाळून लावली आहे.
हेही वाचा -केंद्राकडून राज्याला 9 लाख लसींचा पुरवठा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
- हायकोर्टाने याचिका फेटाळली -
मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर अशा कोस्टल रोडचं बांधकाम सुरू आहे. हा कोस्टल रोड साधारण 29 किलोमीटर लांबीचा आहे. दरम्यान, या 29 किलोमीटर लांबीच्या मार्गावर अनेक ठिकाणी जोड रस्ते देखील या कोस्टल रोडला जोडण्यात येणार आहेत. भुलाभाई देसाई रोड येथे जोड रस्ता निर्माण होत असताना साधारण 61 झाडे तोडण्यात येणार आहेत. त्यामुळं मनपातर्फे साधारण 79 झाडं पुनर्रोपन केली जाणार आहेत. या संदर्भातील पत्रक मनपाकडून त्यांच्या वेबसाईटवर देण्यात आलं आहे. मात्र, या झाडांच्या तोडीला सोसायटी फॉर इम्प्रूमेंट ग्रीनरी अँड नेचर या संस्थेनं हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
हेही वाचा -गोपीचंद पडळकरांच्या कारवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या सोलापुरातील मुख्य कार्यालयावर दगडफेक