मुंबई - काही दिवसांपूर्वी क्यार वादळ आले होते. आता पाठोपाठ आलेल्या 'महा' वादळामुळे मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. १५० रुपये किलोने मिळणारे बोंबील, ५०० ते ६०० रुपये मिळणारी सुरमई आणि पापलेट त्याचप्रमाणे कोळंबी या मासळीला बाजारात सोन्याचा भाव आला आहे. यामुळे मासे प्रेमींना मासे खाण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागत लागत आहे. याचा मासळीबाजरावर सुद्धा परिणाम झाला आहे.
'महा'चक्रीवादळामुळे मासळीला आलाय 'सोन्याचा दर' - क्यार चक्रीवादळ
समुद्रात आलेल्या वादळामुळे जास्त बोटी समुद्रात जाण्यात बंदी घालण्यात आली आहे. यामुळे मासळीचा पुरवठा कमी झाला आहे आणि मागणी त्याहून जास्त आहे. त्यामुळे मच्छी महागली आहे. पूर्वी ७०० ते ८०० रुपयांना मिळणारी बोंबिलची टोपली आता १५०० रुपये म्हणजेच दुपटीने विकत घ्यावी लागत आहे.
सुरमई, पापलेट या माशांपैकी मोठ्या आकाराच्या माशाला १००० ते १२०० रुपये मोजावे लागत आहेत. तर, कोळंबी आणि हलव्याचे दर देखील वधारल्यामुळे खवय्यांची मोठी पंचाईत झाली आहे. अरबी समुद्रात पंधरा दिवसांपूर्वी निर्माण झालेले क्यार वादळ ओमानकडे सरकले आहे. आता पाठोपाठ आलेल्या महा वादळाची भीती मच्छिमारांमध्ये निर्माण झाली आहे. शासनाकडूनही त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
समुद्रात आलेल्या वादळामुळे जास्त बोटी समुद्रात जाण्यात बंदी घालण्यात आली आहे. यामुळे मासळीचा पुरवठा कमी झाला आहे आणि मागणी त्याहून जास्त आहे. त्यामुळे मच्छी महागली आहे. पूर्वी ७०० ते ८०० रुपयांना मिळणारी बोंबिलची टोपली आता १५०० रुपये म्हणजेच दुपटीने विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे खवय्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. तसेच, व्यापाऱ्यांवरही संकट ओढवले असल्याचे मासे विक्रेत्यांनी सांगितले.