मुंबई -भाजप नेते किरीट सोमैया यांचा मुलगा नील सोमैया यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून नील सोमैया यांच्याविरोधात वसई येथील जमीन खरेदी प्रकरणात तपास सुरू केला असून आतापर्यंत सात जणांचे जबाब नोंदविले गेले आहेत. अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ईओडब्ल्यूने या प्रकरणात तक्रारदाराचे जबाब ही नोंदवले आहेत. नील सोमैया आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील ( PMC Bank scam ) आरोपी राजेश वाधवान यांच्यात संबंध असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
नील सोमैया यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता - मुंबई पोलिसांनी नील सोमैया यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. या प्रकरणात EOW ने 7 लोकांचा जवाब देखील नोंदवला आहे. EOW ने या प्रकरणातील तक्रारदाराचे जबाबही नोंदवले आहे जेणेकरून या प्रकरणाची तक्रार बारकाईने समजून घेता येईल. त्यामुळे नील सोमैया यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधात केलेल्या कारवाईनंतर आता राज्य सरकार देखील भाजप नेत्यांनी विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तर राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार सामना रंगला आहे.