महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आपत्कालीन विभागाकडे २४ तासांत ३२०२ कॉल, २ जणांचा मृत्यू, तर दोघे जखमी

सोमवार सायंकाळपासून बरसत असलेल्या पावसामुळे दोन दिवसात शहर तुंबले आहे. बुधवार ते गुरुवार २४ तासांत पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर ३ हजार २०२ कॉलची नोंद झाली.

monsoon in mumbai
बुधवार ते गुरुवार २४ तासांत पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर ३ हजार २०२ कॉलची नोंद झाली.

By

Published : Aug 7, 2020, 10:25 AM IST

मुंबई - सोमवार सायंकाळपासून बरसत असलेल्या पावसामुळे दोन दिवसात शहर तुंबले आहे. बुधवार ते गुरुवार २४ तासांत पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर ३ हजार २०२ कॉलची नोंद झाली. या २४ तासांत ३६१ झाडे आणि फांद्या पडण्याच्या तक्रारी आल्या आहेत. उद्यान विभागाने अग्निशमन दलाशी समन्वय ठेऊन या तक्रारी दूर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली, तर शॉक लागून २ जणांचा मृत्यू झालाय. घराचा भाग अंगावर पडून दोघे जखमी झाले. मुंबई व उपनगरात येत्या २४ तासांत मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बुधवार ते गुरुवार २४ तासांत पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर ३ हजार २०२ कॉलची नोंद झाली.

मुंबईत बुधवारी सकाळी ८ ते गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासांत कुलाबा येथे ३३, तर सांताक्रुझ येथे १६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले.

शॉक लागून दोघांचा मृत्यू

मुसळधार पावसात दहिसर पूर्व येथे एका व्यक्तीला आणि मशिद बंदर येथे रेल्वे कर्मचाऱ्याला विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. दहिसर पूर्व येथील आनंद नगरातील एन एल कॉम्प्लेक्सच्या माईल स्टोन सोसायटीत शंभू सोनी (३८ वर्षे) व्यक्तीला शॉक लागला. त्यांना तत्काळ कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.‌ मात्र, याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मशिद बंदर, साईबाबा मंदिर येथून जाणारा रेल्वे कर्मचारी संजीव (२० वर्ष) विजेचा झटक बसला. स्थानिकांनी त्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

बुधवार ते गुरुवार २४ तासांत पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर ३ हजार २०२ कॉलची नोंद झाली.
घराचा भाग अंगावर कोसळून दोन जखमी

अंजना इस्टेट चाळ, भांडूप व्हिलेज, भांडूप पश्चिम येथे तळ अधिक एक मजला असलेल्या घरासमोरील गॅलरीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत अजय अग्रवाल (४८) व कांती अग्रवाल (६६) हे दोघे जखमी झाले. दोघांनाही मुलुंड येथील वीर सावरकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर दोघांनाही घरी सोडण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, दादर प्रभादेवी सिद्धीविनायक मंदिराजवळील तळ अधिक चार मजली जयप्रकाश इमारत आहे. ही इमारत धोकादायक असल्याने पालिकेने नोटीस बजावली होती. तसेच एप्रिल २०२० पासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार होते. त्याआधीच गुरुवारी इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरच्या गॅलरीचा भाग कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने सांगितले.

३६१ ठिकाणी झाडे पडली

मागील २४ तासांत कोसळलेल्या पावसामुळे शहरात २७४ पूर्व उपनगरांत ४० व पश्चिम उपनगरांत ४७, अशा एकूण ३६१ ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या पडल्या. कुर्ला पश्चिम ग्लीप परेरा चाळ रेशन शॉप क्रमांक ९ च्या जवळ अर्चल पार्क इमारतीच्या जवळ झाड पडून एक जण जखमी झाला. जखमीस कूपर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details