महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

तब्बल दीडशे बनावट वेबसाईट बनवणाऱ्या उच्चशिक्षित आरोपीला दरभंगा येथून अटक

मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे सिएट कंपनीची बनावट वेबसाइट करून नागरिकांना लुटण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली होती. मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी बिहारमधील दरभंगा येथून आरोपीला अटक केली आहे.

मुंबई
मुंबई

By

Published : Apr 19, 2021, 4:06 PM IST

मुंबई -वाहन क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या सिएट टायर कंपनीची बनावट वेबसाइट तयार करून त्याद्वारे नागरिकांना सीएट कंपनीची डीलरशिप देण्याचे आमिष दाखवून फसवणाऱ्या आरोपीला मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी बिहारच्या दरभंगामधील आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव राजेश चौधरी (27) आहे. त्याने B.TECH चे संगणकीय शिक्षण पूर्ण केले असून तो एमटेकच्या प्रथम वर्षात नुकतचं उत्तीर्ण झाला आहे.

मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे सिएट कंपनीची बनावट वेबसाइट करून नागरिकांना लुटण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली होती. या संदर्भात सायबर पोलिसांकडे 8 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केल्यानंतर या संदर्भात तांत्रिक तपास केला असता सदरचा आरोपी हा दरभंगा बिहार येथील राहिवासी असल्याचे समोर आले. पोलिसांनी एक पथक पाठवून त्यास दरभंगा येथून अटक केली. आरोपी सोनू चौधरी हा 27 वर्षाचा आहे. या आरोपीची स्वतःची मीथिला इन्फो सॉफ्टवेअर नावाची कंपनी असून या कंपनीच्या मार्फत त्याने आतापर्यंत 15 नामांकित कंपनीच्या बनावट वेबसाइट तयार केल्या आहेत.

या आहेत बनावट वेबसाईट

1)dataentryhome job.onlines
2)ceattyressales.in
3)bajajfiance.co.in
4)jktyrefranchises.co.in
5)aaditya fiance.in
6)homejobs.co.in
7)haladiramfranchisesmumbai.com
8)sevakendra.co.in
9)cspsseraonline
10)hdafacfiancemionline.co.in
11)smsdataentryhomejobs.in
12)patanjali.online
13)smsdataentryhomejobs.vo.in
14)dataentryhomejobs.co.in
15) jktyresales .com


पोलिसांनी अटक आरोपीकडून 2 मोबाईल, 1 लॅपटॉप, 1 हार्ड डिस्क जप्त केली आहे. आतापर्यंतच्या तपासात आरोपीने 150 पेक्षा अधिक बनावट वेबसाइटची कोडींग केली असून वेगवेगळ्या वेबसाईट डेव्हलप करून त्या होस्ट करण्याची तयारी त्याने केली असल्याचा पोलिसांचा दावा आहे. अटक आरोपी व त्याच्या इतर साथीदारांनी अनेक नामांकित कंपनीची डीलरशिप देणे असल्याच सांगत, कर्ज देणाऱ्या संस्था, डाटा एंट्री वर्क यासारख्या बनावट वेबसाइट तयार करून लोकांची फसवणूक केलेली आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details