मुंबई - विविध बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये पहाटे जाऊन त्यात स्कीमर मशीन लावून बँक ग्राहकांचे एटीम क्लोन करणाऱ्या दोन नायजेरियन आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
एटीएम क्लोनिंग करणाऱ्या २ नायजेरियन आरोपीना अटक; पोलिसांनी वॉचमनचा वेशात बजावली कामगिरी - atm
मालाड परिसरातील १३ मे रोजी एका एटीएम सेंटरवर पहाटे २ वाजता इसाही ओंग्नेलु सेयी (वय ३४) हा नायजेरियन व्यक्ती आला. एटीएमच्या आत गेल्यानंतर पुन्हा बाहेर घाबरलेल्या अवस्थेत आला असता, वॉचमन म्हणून पहाऱ्यावर असलेल्या पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला.
गेल्या काही महिन्यांपासून मालाड परिसरात एटीएममधून परस्पर लाखो रुपये काढून घेतले जात असल्याची तक्रार येत होती. या संदर्भात समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या ४ पथकांनी मालाड परिसरातील वेगवेगळ्या एटीएम सेंटरवर स्वतः वॉचमनचा वेश परिधान करून पहारा देण्यास सुरुवात केली होती.
मालाड परिसरातील १३ मे रोजी एका एटीएम सेंटरवर पहाटे २ वाजता इसाही ओंग्नेलु सेयी (वय ३४) हा नायजेरियन व्यक्ती आला. एटीएमच्या आत गेल्यानंतर पुन्हा बाहेर घाबरलेल्या अवस्थेत आला असता, वॉचमन म्हणून पहाऱ्यावर असलेल्या पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. या नायजेरियन आरोपीस पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पळून जाण्यास सुरुवात केली. जवळपास १ किलोमीटरपर्यंत फिल्मी स्टाईलने पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून त्यास पकडले. त्याच्या झडतीत पोलिसांना स्कीमर मशीन, मायक्रोकॅमेरा, व क्लोनिंग कार्ड मिळून आले.
पोलिसांनी केलेल्या तपासात आणखीन एक नायजेरियन महिला आरोपी खरड रोझी मॉगी (वय ३८) हिला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी गेल्या काही महिन्यांपासून नालासोपारा पूर्व येथील प्रिन्स अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या घरात राहून एटीएम मशीनमध्ये स्कीमर मशीन लावून पैसे लुटत होते. या आरोपीनी मुंबईतील आणखीन किती एटीएम मशीनमध्ये अशा प्रकारे स्कीमर लावले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.