मुंबई - मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत सलग दोन दिवस 8 हजाराच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. आज त्यात वाढ होऊन तब्बल 9090 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची नोंद आज झाली आहे.
62 हजार 187 सक्रिय रुग्ण -
मुंबईत आज 9,090 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 41 हजार 282 वर पोहचला आहे. आज 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 11 हजार 751 वर पोहचला आहे. 5,322 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 66 हजार 365 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 62 हजार 187 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 44 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 70 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 681 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 42 लाख 17 हजार 751 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
..हे विभाग हॉटस्पॉट -