मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असताना ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज मुंबईत कोरोनाच्या 2 हजार 203 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 3 हजार 74 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत आज (शनिवारी) कोरोनाचे 2 हजार 203 नवे रुग्ण आढळून आले असून 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 37 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 37 पुरुष तर 11 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 27 हजार 251 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 9 हजार 388 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 3 हजार 74 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 92 हजार 096 वर गेला आहे. सध्या मुंबईत 22 हजार 369 सक्रिय रुग्ण आहेत.