मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट ( Third Wave of Corona Virus in Mumbai ) आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. सोमवार ते बुधवार असे सलग तीन दिवस १८०० च्यावर रुग्ण आढळून आले. त्यात आणखी घट होऊन गुरुवारी आणि शुक्रवारी १३०० च्या वर रुग्ण आढळून आले. शनिवारी त्यात किंचित वाढ होऊन १४११ नव्या रुग्णांची नोंद झाली. आज (रविवारी) त्यात घट होऊन ११६० रुग्णांची नोंद झाली ( 1160 New Corona Patients Registered January 31 ) आहे. तर आज १० मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या १० हजार ७९७ सक्रिय रुग्ण आहेत.
- ११६० नव्या रुग्णांची नोंद
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (31 जानेवारीला) ११६० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १० मृत्यूची नोंद झाली आहे. आज २५३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ४५ हजार ६३० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख १५ हजार ४५१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १०७९७ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३७५ दिवस इतका आहे. मुंबईमधील ८ इमारती सील आहेत. २३ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.१८ टक्के इतका आहे.
- ९३ टक्के बेड रिक्त
मुंबईत आज आढळून आलेल्या ११६० रुग्णांपैकी १००९ म्हणजेच ८७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज १६० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. २९ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३७,५७३ बेडस असून त्यापैकी २२६८ बेडवर म्हणजेच ६ टक्के बेडव रुग्ण आहेत. इतर ९४ टक्के बेड रिक्त आहेत.
- रुग्णसंख्येत चढ-उतार