मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. मागील आठवड्यात सोमवार ते बुधवार असे सलग तीन दिवस १८०० च्या वर रुग्ण आढळून आले. त्यात घट होऊन सोमवारी ९६० तर काल मंगळवारी ८०३ रुग्णांची नोंद झाली. आज त्यात वाढ होऊन ११२८ नव्या रुग्णांची नोंद ( MumbaiCorona Update ) झाली. आज १० मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के असून ८१५८ सक्रिय रुग्ण आहेत.
- ११२८ नव्या रुग्णांची नोंद -
मुंबईत डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (२ फेब्रुवारीला) ११२८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १० मृत्यूची नोंद झाली आहे. आज १८३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ४८ हजार ५२१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख २० हजार ९२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ८१५८ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५७० दिवस इतका आहे. मुंबईमधील ४ इमारती सील आहेत. २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.१२ टक्के इतका आहे.
- ९.१ टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या ११२८ रुग्णांपैकी ९९३ म्हणजेच ८८ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज १०८ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. २५ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३७,१८५ बेडस असून त्यापैकी १९५३ बेडवर म्हणजेच ५.३ टक्के बेडव रुग्ण आहेत. इतर ९४.७ टक्के बेड रिक्त आहेत.
- नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -