महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत रुग्णसंख्येत घट सुरूच, ७८९५ नवे रुग्ण, ११ जणांचा मृत्यू, २१,०२५ रुग्णांना डिस्चार्ज

मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. तिसऱ्या लाटेत ६ ते ८ जानेवारी दरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्या वर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली असली तरी सतत चढ उतार पाहायला मिळत आहे. गुरुवारी रुग्णसंख्येत घट होऊन १३७०२ शुक्रवारी ११३१७, काल शनिवारी १०६६१ रुग्णांची नोंद झाली. आज रविवारी त्यात आणखी घट होऊन ७८९५ रुग्णांची नोंद झाली आहे. आज ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ६० हजार ३७१ सक्रिय रुग्ण आहेत.

mumbai-corona-update
mumbai-corona-update

By

Published : Jan 16, 2022, 7:21 PM IST

Updated : Jan 16, 2022, 8:02 PM IST

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. तिसऱ्या लाटेत ६ ते ८ जानेवारी दरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्या वर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली असली तरी सतत चढ उतार पाहायला मिळत आहे. गुरुवारी रुग्णसंख्येत घट होऊन १३७०२ शुक्रवारी ११३१७, काल शनिवारी १०६६१ रुग्णांची नोंद झाली. आज रविवारी त्यात आणखी घट होऊन ७८९५ रुग्णांची नोंद झाली आहे. आज ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ६० हजार ३७१ सक्रिय रुग्ण आहेत.

७८९५ नव्या रुग्णांची नोंद -

मुंबईत आज (१६ जानेवारीला) ७८९५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ११ मृत्यूची नोंद झाली आहे. आज २१,०२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ९ लाख ९९ हजार ८६२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ९ लाख २० हजार ३८३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ४५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ६० हजार ३७१ वर पोहचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४८ दिवस इतका आहे. मुंबईमधील ५४ इमारती सील आहेत. ९ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर १.४० टक्के इतका आहे.

८५ टक्के बेड रिक्त -

मुंबईत आज आढळून आलेल्या ७८९५ रुग्णांपैकी ६६३२ म्हणजेच ८४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ६८८ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ९२ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३८,१२७ बेडस असून त्यापैकी ५७२२ बेडवर म्हणजेच १५ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ८५ टक्के बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्या अशी घटतेय -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात वाढ हाऊ लागली. ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१, ८ जानेवारीला २०,३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून ९ जानेवारीला १९४७४, १० जानेवारीला १३६४८, ११ जानेवारीला ११६४७, १२ जानेवारीला १६४२०, १३ जानेवारीला १३७०२, १४ जानेवारीला ११३१७, १५ जानेवारीला १०६६१, १६ जानेवारीला ७८९५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

धारावीत ३२ रुग्ण -

मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली. ७ जानेवारीला १५० तर ८ जानेवारीला १४७ सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत गेली. आज १६ जानेवारीला ३२ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत एकूण ८४१६ रुग्ण असून ७६२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या ३७० सक्रिय रुग्ण आहेत.

ओमायक्रॉनचे १५ नवे रुग्ण -

मुंबईत ओमायक्रॉनचे १५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा ६४१ वर गेला आहे. परदेशातून आलेले ३०७ प्रवासी तर ३३४ मुंबईकर नागरिकांचा त्यात समावेश आहेत. आतापर्यंत ३०७ परदेशी प्रवासी तर ३०९ मुंबईकर अशा एकूण ६१६ रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.

Last Updated : Jan 16, 2022, 8:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details