मुंबई -मुंबईत रोज ८ ते १३ हजार दरम्यान चाचण्या केल्या जातात. यामुळे ८०० ते १२०० दरम्यान रोज रुग्णसंख्या नोंद होत होती. आज रविवारी ६१० रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत रोज १ किंवा दोन रुग्णांचा मृत्यू होत होता. त्यात आज वाढ होऊन ४ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ४९६९ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
६१० नवे रुग्ण -मुंबईत आज २८ ऑगस्टला ९,६३५ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ६१० रुग्णांची नोंद झाली. आज ४ मृत्यूची नोंद झाली आहे. ८१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ४३ हजार ३१८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख १८ हजार ६६१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४९६९ सक्रिय रुग्ण Active Corona Patients आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १०४२ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०६६ टक्के इतका आहे.
रुग्णसंख्येत वाढ -मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. २ ऑगस्टला ३२९, ३ ऑगस्टला ४३४, ४ ऑगस्टला ४१०, ५ ऑगस्टला ४४६, ६ ऑगस्टला ४८६, ७ ऑगस्टला ४६५, ८ ऑगस्टला ४०७, ९ ऑगस्टला ४७९, १० ऑगस्टला ८५२, ११ ऑगस्टला ६८३, १२ ऑगस्टला ८७१, १३ ऑगस्टला ८६७, १४ ऑगस्टला ८८२, १५ ऑगस्टला ५८४, १६ ऑगस्टला ३३२, १७ ऑगस्टला ९७५, १८ ऑगस्टला १२०१, १९ ऑगस्टला १०११, २० ऑगस्टला ८४०, २१ ऑगस्टला ८१८, २२ ऑगस्टला ५९२, २३ ऑगस्टला ८३२, २४ ऑगस्टला ७९३, २५ ऑगस्टला ८३८, २६ ऑगस्टला ६७९, २७ ऑगस्टला ६२५, २८ ऑगस्टला ६१० रुग्णांची नोंद झाली आहे.
११९ वेळा शून्य मृत्यूची नोंद -मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ११९ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा तर ऑगस्ट महिन्यात ७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.