मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली होती. ती लाट आता आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट होऊन गेले काही दिवस १०० च्या आत रुग्ण आढळून येत आहेत. सध्या गेल्या २ वर्षांतील सर्वात कमी रुग्णांची नोंद होत आहे. आज ( रविवार ) ४३ रुग्णांची नोंद झाली ( Mumbai Corona News Cases ) आहे. आज १ मृत्यूची नोंद झाली ( Mumbai Corona Death ) आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के ( Mumbai Corona Recovery Rate ) असून, २६८ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.
Mumbai Corona Update : मुंबईत ४३ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, १ मृत्यूची नोंद
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली ( Mumbai Corona Update ) आहे. आज कोरोनाच्या 43 नव्या रुग्णांची नोंद करण्यात ( Mumbai Corona New Cases ) आली. तर, केवळ 1 रुग्णाचा मृत्यू कोरोनाने झाला ( Mumbai Corona Death ) आहे.
४३ नव्या रुग्णांची नोंद -मुंबईत आज ( २७ मार्च ) ४३ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. आज २६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५७ हजार ८२९ रुग्णांची नोंद झाली ( Mumbai Corona Cases ) आहे. त्यापैकी १० लाख ३७ हजार ९८१ रुग्ण बरे झाले ( Mumbai Corona Recoveries ) आहेत. तर १९ हजार ५५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २६८ सक्रिय रुग्ण ( Mumbai Corona Active Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २० हजार ४४० दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडा भरातील कोरोना वाढीचा दर ०.००४ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ४३ रुग्णांपैकी ४२ म्हणजेच ९८ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार २२८ बेड्स असून, त्यापैकी २२ बेडवर म्हणजेच ०.०८ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९९.०२ टक्के बेड रिक्त आहेत.
रुग्णसंख्या घटतेय -मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या, दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून, ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. २१ फेब्रुवारीला ९६, २६ फेब्रुवारीला ८९, २८ फेब्रुवारीला ७३, १ मार्चला ७७, २ मार्चला १००, ३ मार्चला ८०, ४ मार्चला ७८, ५ मार्चला ६५, ६ मार्चला ४६, ७ मार्चला ३८, ८ मार्चला ६०, ९ मार्चला ५४, १० मार्चला ६४, ११ मार्चला ५४, १२ मार्चला ३, १३ मार्चला ४४, १४ मार्चला २७, १५ मार्चला ५०, १६ मार्चला ४४, १७ मार्चला ७३, १८ मार्चला ४८, १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २३ मार्चला ४६, २४ मार्चला ५४, २५ मार्चला ३८, २६ मार्चला ३३, २७ मार्चला ४३ रुग्णांची नोंद झाली आहे.
४१ वेळा शून्य मृत्यूची नोंद -मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली होती. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारीला, १ मार्च, २ मार्च, ३ मार्च, ४ मार्च, ५ मार्च, ७ मार्च, ८ मार्च, ९ मार्च, १० मार्च, ११ मार्च, १२ मार्च, १३ मार्च, १४ मार्च, १५ मार्च, १७ मार्च, १८ मार्च, १९ मार्च, २० मार्च, २१ मार्च, २२ मार्च, २३ मार्च, २४ मार्च, २६ मार्चला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४१ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा -Bhai Jagtap : विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात तपास यंत्रणांची कारवाई का?, भाई जगतापांचा सवाल