मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट ( third wave of corona virus ) आटोक्यात आल्यामुळे रुग्णसंख्येत घट ( Decrease in patients ) होऊन गेले. काही दिवस ५० आत व नंतर १०० वर रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर त्यात वाढ होऊन रुग्णसंख्या २०० च्या वर गेली. आज गुरूवारी त्यात आणखी वाढ होऊन ३५० नव्या रुग्णांची तर शून्य मृत्यूची नोंद ( Mumbai Corona Deaths ) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून १६५८ सक्रिय रुग्ण ( Mumbai Active Corona Patients ) आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
३५० नवे रुग्ण - मुंबईत आज गुरूवारी ३५० नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज २२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६३ हजार ९२१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४२ हजार ६९७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १६५८
सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३६९१ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१९ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ३५० रुग्णांपैकी ३३४ म्हणजेच ९५ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ४८७ बेड्स असून त्यापैकी ६४ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.